Smartphone Tips : सावधान! अशा ठिकाणी चुकूनही चार्ज करू नका फोन, सरकारनेच दिला सतर्कतेचा इशारा

Smartphone Tips : अनेकजण कुठेही स्मार्टफोन चार्ज करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे स्मार्टफोन चार्ज करत असाल तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

ज्यूस जॅकिंग

ज्यूस जॅकिंग हा एक संभाव्य सुरक्षा धोका असून येथे सायबर गुन्हेगार कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसमधून डेटा चोरण्यासाठी किंवा त्यावर मालवेअर स्थापित करण्यासाठी सार्वजनिक USB चार्जिंग पॉइंट्सला लक्ष्य केले जाते. स्मार्टफोन वापरकर्त्यांनी या धोक्याची जाणीव ठेवावी.

लक्षात ठेवा या गोष्टी

CERT-In नुसार, ज्यूस जॅकिंग कोणालाही होते. म्हणून सार्वजनिक चार्जिंग पॉइंटवरून त्यांचा फोन किंवा टॅबलेट चार्ज करताना सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पारंपारिक इलेक्ट्रिकल पॉवर आउटलेट्स

जर वापरकर्त्याला त्यांचा फोन चार्ज करायचा असेल तर सार्वजनिक USB चार्जरऐवजी पारंपारिक इलेक्ट्रिकल वॉल चार्जिंगचा वापर करा. त्यासाठी फक्त पॉवर ॲडॉप्टरची गरज असेल. सीईआरटी-इन म्हणते की वापरकर्त्यांनी प्रवास करताना त्यांचे वैयक्तिक पॉवर ॲडॉप्टर आणि चार्जिंग केबल सोबत ठेवा.

चार्जिंग करताना करा फोन बंद

समजा तुम्हाला सार्वजनिक चार्जिंग पॉईंटवर फोन तातडीने चार्ज करायचा असल्यास तो प्लग इन करण्यापूर्वी फोन बंद करा. यामुळे सायबर गुन्हेगारांचे तुमच्या फोनला लक्ष्य करण्याचा धोका कमी होत जातो.

पॉवर बँकला द्या प्राधान्य

सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्सचा वापर टाळण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे वैयक्तिक पॉवर बँक बाळगा. सध्या बाजारात जलद चार्जिंग आणि मोठ्या बॅटरी क्षमतेच्या अनेक पॉवर बँक मिळतात.

सुरक्षित उपकरण

स्मार्टफोन किंवा टॅबलेटमध्ये मजबूत सुरक्षा लॉक आहे की नाही हे तपासणे खूप गरजेचे आहे. अनधिकृत डेटा प्रवेशाचा कोणताही धोका कमी करण्यासाठी बायोमेट्रिक्ससह डिव्हाइस लॉक करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. वापरकर्त्यांनी जोडलेल्या उपकरणांवरही लक्ष ठेवावे. त्यांचा स्मार्टफोन किंवा टॅबलेट अज्ञात उपकरणांसह जोडू नये.

Leave a Comment