नाशिक : स्मार्टफोन (Smartphone) हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. आता स्मार्टफोनशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही, अशी स्थिती आहे. अशावेळी दिवसभर स्मार्टफोनच्या (Mobile Users) वापरामुळे यूजरला पुन्हा पुन्हा एकाच समस्येला सामोरे जावे लागते, ही समस्या म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे चार्जिंग (Charging) करीत राहण्याची आवश्यकता असते. मात्र, त्यातही काळजी गरजेची आहे.
- 5G Technology : मुंबई, पुण्यासह देशातील ‘या’ शहरांत सुरू होणार नेटवर्क; चेक करा शहरांची यादी
- Lockdown Again: म्हणून महाराष्ट्रासह तिथेही सुरू झालीय लॉकडाऊनबाबत चर्चा
- महिलांना मिळणार 6 हजार रुपये, मोदी सरकारच्या ‘या’ खास योजनेबाबत जाणून घ्या..
जर तुमच्या फोनची बॅटरीही लवकर डेड (Battery Drain In Smartphone) होत असेल तर आता तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. बॅटरी डेड होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चार्जिंगमधील चुका आहेत. अनेक यूजर्स फोन चार्ज करताना चुका करतात. त्यामुळे फोन लवकर डेड होतो. या रिपोर्टमध्ये आम्ही स्मार्टफोन चार्ज करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत जेणेकरून तुमचा स्मार्टफोन दिवसभर चालेल. त्यात महत्वाचे म्हणजे स्मार्टफोन चार्ज करताना यूजर्स अनेकदा अनेक चुका करतात, ज्यामुळे फोनची बॅटरी लवकर डेड होते. यापैकी एक सामान्य चूक म्हणजे कोणताही चार्जर वापरणे. तुम्ही ज्या कंपनीचा फोन खरेदी करता त्या कंपनीचा चार्जर नेहमी वापरा.
जलद चार्जिंग चार्जरचा (Misuse of fart charging charger) वापर करून स्मार्टफोन लवकर चार्ज करता येईल, असे यूजर्सचे मत आहे. असे विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण काही स्मार्टफोन जलद चार्जिंगला सपोर्ट करत नाहीत. यामुळे, फोन लवकर गरम होतो, काही प्रकरणांमध्ये मदरबोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होते. त्यामुळे चार्जर फक्त फोनसोबत आलेला वापरा आणि जलद चार्जिंग चार्जर आपण वापरत नाही ना याचीही काळजी घ्या. नाहीतर बॅटरी डेड होण्यासह फोन गरम होणे, त्याचे सर्किट जळणे किंवा काहीवेळा तर त्याचा स्फोट (Blast) होण्याचीही शक्यता आहे.