Smartphone Offer : सोडू नका अशी संधी! हजारोंच्या सवलतीत खरेदी करता येतील ‘हे’ फोन, खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी

Smartphone Offer : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. तुम्ही आता सॅमसंग, रियलमी आणि रेडमीचे 5G फोन 12 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही आता Amazon च्या सेलमधून हे फोन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M15 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनच्या व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. कंपनी या फोनवर 700 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत ​​आहे. या फोनवर 600 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत 11,050 रुपयांनी कमी करता येईल. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर या फोनमध्ये 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. कंपनीच्या या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून डायमेंशन 6100+ प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा फोन 6000mAh बॅटरीसह येईल.

Realme narzo 70x 5g ऑफर

4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणारा कंपनीचा हा शानदार फोन Amazon च्या 5G Superstore वर 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 600 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही त्याची किंमत 11,050 रुपये कमी करता येईल. Realme चा हा फोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह अल्ट्रा स्मूद डिस्प्लेसह येतो. कंपनीच्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळेल. या Realme फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.

Redmi 12 5G ऑफर

Redmi च्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज फोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. हे 1250 रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह सेलमध्ये खरेदी करता येईल. कंपनी या फोनवर 750 रुपयांची बँक डिस्काउंट मिळेल. तसेच कंपनी या फोनवर 600 रुपयांची बँक डिस्काउंट देत ​​आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत आणखी 11,050 रुपयांनी कमी करता येईल. हा Redmi फोन 90Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्लेने सुसज्ज आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment