Smartphone Offer : बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. पण तुम्ही उत्तम कॅमेरा असणारा फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही काही फोन्स खरेदी करू शकता. पहा लिस्ट.
infinix जीरो 20
20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या या फोनमध्ये 60 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दिलेला हा कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येत असून याच्या मागील बाजूस 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. कंपनी 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा देत आहे. या फोनचा डिस्प्ले 6.7 इंच असून तो फुल एचडी+ रिझोल्यूशनसह येतो. 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G99 प्रोसेसर पाहायला मिळेल.
Vivo V30 Pro
Vivo चा हा जबरदस्त फोन काही दिवसांपूर्वीच बाजारात लॉन्च झाला असून या फोनमध्ये कंपनीकडून सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून दिला आहे. कंपनी फोनच्या मागील बाजूस तीन 50-मेगापिक्सेल कॅमेरे देत असून या फोममध्ये तुम्हाला 1260×2800 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78 इंच डिस्प्ले पाहायला मिळेल. हा पंच-होल डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंशन 8200 चिपसेट देत आहे. तसेच या Vivo फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo V29e
Vivo चा हा फोन 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह येतो. तुम्हाला या फोनच्या मागील बाजूस एक उत्तम कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. ही कंपनी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देत असून यात 64-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेऱ्याचा समावेश आहे. कंपनीच्या या फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह येतो. या फोनमध्ये तुम्हाला फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी 5000mAh असून ती 44 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.