Smartphone offer : धमाकेदार ऑफर! बजेटमध्ये खरेदी करा सर्वाधिक विक्री करणारे ‘हे’ फोन, जाणून घ्या अधिक

Smartphone offer : Amazon आणि Flipkart ने एक मोठी ऑफर आणली आहे. तुम्ही आता सर्वात जास्त विक्री करणारे फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

Jio स्मार्टफोन

किमतीचा विचार केला तर 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन Amazon वर 5,799 रुपयांना मिळेल. बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी होईल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे ईएमआय व्यवहार करावा लागणार आहे. कंपनी या फोनवर 290 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. तुम्हाला या फोनमध्ये 5.45 इंच HD+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. ऑफर Amazon वर मिळत आहे.

नोकिया C22

किमतीचा विचार केला तर 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या Nokia C22 या फोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ५% कॅशबॅकसह खरेदी करता येईल. तुम्हाला फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

हा फोन तुमचा 211 रुपयांच्या EMI वर देखील असू शकतो. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही कोटक बँकेचे कार्ड वापरल्यास, तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. कंपनी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देत असून याचा डिस्प्ले 6.5 इंच आहे आणि तर बॅटरी 5000mAh आहे.

itel A60

स्टोरेज आणि किमतीचा विचार केला तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 5,799 रुपये इतकी आहे. तर हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही कोटक बँकेचे कार्ड वापरले तर तुम्हाला 1,000 रुपयांची सवलत मिळेल.

कंपनी फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डधारकांना 5% कॅशबॅक देत असून हा फोन 204 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर खरेदी करू शकता. तुम्हाला या एंट्री लेव्हल फोनमध्ये 6.6 इंचाचा HD डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे.

Leave a Comment