Smartphone Offer । हल्ली स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. अनेक कंपन्या आपले जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. अनेकांचे फोन खरेदी करण्याचे बजेट खूप कमी असते. पण आता तुम्ही स्वस्तात Xiaomi आणि Realme यांसारखे फोन खरेदी करू शकता.
Realme 12 Pro+ 5G स्मार्टफोन
किमतीचा विचार केला तर Realme स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 28,768 रुपये आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच 3D वक्र OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असणाऱ्या कंपनीच्या या फोनच्या 5000mAh बॅटरीला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. 50MP मुख्य आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर शिवाय यात एक 64MP टेलिफोटो पेरिस्कोप सेन्सर मागील पॅनलवर दिला आहे आणि तो 50MP सेल्फी कॅमेरासह येतो.
Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन
तुम्हाला हा Xiaomi स्मार्टफोन 27,849 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याच्या मागील पॅनलमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा लेन्ससह 8MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा 16MP फ्रंट कॅमेरासह येतो आणि 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आहे.
Vivo V29e 5G स्मार्टफोन
तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह Vivo स्मार्टफोन 26,650 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरसह 6.78-इंचाचा 3D वक्र डिस्प्ले देण्यात आला असून हा फोन 50MP सेल्फी कॅमेरासह येतो आणि त्याच्या मागील पॅनलवर 8MP दुय्यम लेन्ससह 64MP प्राथमिक सेन्सर दिला आहे.