Smartphone Offer : स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता 20 हजारांपेक्षा स्वस्तात OnePlus आणि Xiaomi सारखे फोन खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स मिळतील.
OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन
OnePlus चा हा फोन सेगमेंटमधील सर्वात उत्तम फोन म्हणून खरेदी केला जाऊ शकतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर शिवाय या फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा दिला आहे. 16MP सेल्फी कॅमेरा असणाऱ्या या फोनचे बेस मॉडेल 17,999 रुपयांना उपलब्ध करून दिले आहे आणि जर तुम्ही निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर यावर 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Redmi Note 13 5G स्मार्टफोन
Redmi Note 13 5G स्मार्टफोनमध्ये उच्च रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा FHD+ poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Mediatek Dimensity 6080 प्रोसेसर मजबूत कामगिरीसाठी उपलब्ध असून सर्वात उत्तम फोटोग्राफी अनुभवासाठी, यात 108MP मुख्य कॅमेरा आणि जलद चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा हा जबरदस्त फोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून आहे आणि त्यावर 1,000 रुपयांची बँक सवलत देखील दिली जात आहे.
Realme 11 5G फोन
कंपनीच्या Realme 11 5G फोनमध्ये 6.72 इंच डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर देण्यात आहे. 108MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त, फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. त्याच्या 5000mAh बॅटरीला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. किमतीचा विचार केला तर हे Amazon वर 18,149 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते.