Smartphone Offer : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता OnePlus चे काही फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.
OnePlus Nord CE 3 5G वर मिळत आहे ऑफर
किमतीचा विचार केला तर Amazon सेलमध्ये, OnePlus Nord CE 3 5G चे 8GB + 128GB व्हेरिएंट Rs 18,999 मध्ये उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की लॉन्चच्या वेळी या वेरिएंटची किंमत 26,999 रुपये होती. हा फोन सेलमध्ये लॉन्चच्या किंमतीपेक्षा 8,000 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल.
या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी दिली आहे.
OnePlus 11R 5G वर मिळत आहे ऑफर
कंपनीचा हा 8GB + 128GB व्हेरिएंट फक्त 30,740 रुपयांना खरेदी करता येईल. लॉन्चच्या वेळी या वेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी होती. हा फोन सध्या लॉन्च किंमतीपेक्षा 9,259 रुपयांनी कमी असून बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला त्याची किंमत आणखी कमी करता येईल. यात 6.72-इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर, 50-मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G ऑफर
Amazon सेलमध्ये, फोनमध्ये 8GB + 128GB व्हेरिएंट फक्त 17,249 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. पण लॉन्चच्या वेळी या वेरिएंटची किंमत 19,999 रुपये होती. हा फोन लॉन्च किंमतीपेक्षा 2,750 रुपयांना खरेदी करता येईल.
या फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला त्याची किंमत आणखी कमी करू शकता. फोनमध्ये 6.72-इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर, 108-मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा, 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.