Smartphone Offer : सर्वात भारी ऑफर! 5G फोनवर अवघ्या 1 रुपयात मिळणार हिरोची शक्तिशाली बाइक

Smartphone Offer : तुमच्याकडे आता अवघ्या 1 रुपयात हिरोची शक्तिशाली बाइक खरेदी करण्याची संधी आहे. 5G फोनवर तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Poco X6 Neo 5G फोनवर ही संधी दिली जात आहे.

Poco चा हा जबरदस्त स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरून खरेदी करू शकता. हा फोन आज लॉन्च झाल्यानंतर, या फोनची पहिली थेट विक्री संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. आज ज्या ग्राहकांनी Poco X6 Neo 5G खरेदी केली आहे, त्यापैकी पाच भाग्यवान ग्राहकांना महागडी मोटारसायकल केवळ 1 रुपयात खरेदी करता येणार आहे. ही ऑफर Hero Xtreme बाईकवर देण्यात येत आहे.

मिळतील हे कलर पर्याय

Poco X6 Neo 5G हा फोन तुम्ही Astral Black, Horizon Blue आणि Martian Orange या तीन रंगात खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत अद्याप जाहीर केली नाही परंतु मिडरेंज सेगमेंटमध्ये विशेष ऑफरसह खरेदी करण्याची संधी मिळेल. लाइव्ह सेलमध्ये अधिक रिवॉर्ड्स आणि अगदी मोफत फोनही देण्यात येतील.

जाणून घ्या फीचर्स

पोकोचा हा फोन पंच-होल स्क्रीनसह येत असून यात कंपनी स्क्रीन टू बॉडी रेशो 93.3% देत आहे. खूप कमी बेझल असणाऱ्या या फोनची जाडी 7.69mm असून कंपनीने पुष्टी केली आहे की ती या फोनमध्ये OLED डिस्प्ले देईल. कंपनीने शेअर केलेल्या टीझरनुसार, हा फोन 108-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह येणार आहे. ही कंपनी फोन ब्लू आणि गोल्डनसह आणखी अनेक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करेल.

रिपोर्ट्सनुसार, हा फोन Redmi Note 13 Pro 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असून जो कंपनीने मागील वर्षी चीनमध्ये लॉन्च केला होता. Poco च्या नवीन फोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच फोनमध्ये ऑफर केलेल्या या डिस्प्लेमध्ये उच्च-रिफ्रेश दर असेल. प्रोसेसर म्हणून, कंपनी फोनमध्ये डायमेंशन 6080, डायमेंशन 810 ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती देईल.

कंपनी Redmi Note 13R Pro सारख्या 108 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा देण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी, Poco च्या नवीन फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, कंपनी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देईल. यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक दिसेल. फोनची बॅटरी 5000mAh असून ती 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Leave a Comment