Smartphone Offer: शानदार ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असलेले 5G फोन

Smartphone Offer: स्मार्टफोन हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य बनला आहे. स्मार्टफोनशिवाय कित्येकांची अनेक कामे रखडून पडतात. त्यामुळे गरज आणि मागणी लक्षात घेता कंपन्या आता स्मार्टफोन लाँच करत असतात. बाजारात आता 5G फोन दाखल होत आहेत.

पण या फोनच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हालाही 5G फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही आता खूप कमी किमतीत 5G फोन खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर (Smartphone Offer) Amazon ने आणली आहे. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर.

iQOO Z7s 5G स्मार्टफोन ऑफर

किमतीचा विचार केला तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणारा iQOO चा हा फोन 15,999 रुपयांना उपलब्ध आहे. पण आता तो तुम्ही तुम्ही 1200 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह आणि 14,750 रुपयांपर्यंतच्या शानदार एक्सचेंज बोनससह विकत घेऊ शकता. कंपनीच्या या फोनवर दिलेला एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

तसेच या फोनमध्ये, कंपनी 6 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम देत असल्याने आवश्यक असल्यास फोनची एकूण रॅम 12 जीबीपर्यंत मिळते. कंपनीच्या या शानदार स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 44 वॅटची फास्ट चार्जिंग बॅटरी पाहायला मिळेल.

OnePlus CE 3 Lite 5G स्मार्टफोन ऑफर (Smartphone Offer)

आता तुम्ही हा OnePlus CE 3 Lite 5G फोन 17,999 रुपयांना खरेदी विकत घेऊ शकता. बँक ऑफरमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत तब्बल 1400 रुपयांनी कमी करता येईल. शिवाय कंपनी या फोनवर 16,700 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. पण हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

वनप्लसचा हा फोन 108 मेगापिक्सेल मुख्य कॅमेराने सुसज्ज असून कंपनीचा हा जबरदस्त स्मार्टफोन 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करेल. या फोनमध्ये कंपनीने प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला असून या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Lava Agni 2 5G स्मार्टफोन ऑफर (Smartphone Offer)

कंपनीचा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असून यामद्ये 8 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट दिला आहे. किमतीचा विचार केला तर ऑफरमुळे या फोनची किंमत 17,999 रुपये झाली आहे. तुम्ही बँकेच्या ऑफरमध्ये 1400 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीसह खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर 16,799 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

हे लक्षात घ्या की एक्सचेंज बोनस हा तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये MediaTek 7050 चिपसेट आणि 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देत असून या फोनची बॅटरी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Leave a Comment