अहमदनगर : स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये येत आहेत तसा फोनचा इंटरनेटवरील खर्चही वाढत चालला आहे. कारण, मोबाइल नेटवर्क कंपन्या आता त्यांच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ करत आहेत. बहुतेक प्रीपेड प्लॅन्स दैनिक डेटा मर्यादेसह येतात. त्यामुळे डेटासाठी वारंवार रिचार्ज करावे लागते. बऱ्याच जणांचा डेटाचा वापर जास्त असतो. अशा वेळी त्यांना त्यांच्या प्लानमधील दैनंदीन डेटा व्यतिरिक्त अतिरिक्त डेटा घ्यावा लागतो. यासाठीही मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत खर्च करणे त्रासदायक ठरते. त्यामुळे इंटरटनेट डेटा लवकर संपत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मिळणारा दैनंदिन डेटा तुम्ही दिवसभर चालवू शकता.
मोबाइल डेटा वापरत असताना, अधिक डेटा वापरणाऱ्या अॅप वापर कमी करा. जसे की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओमुळे आधिक डेटा खर्च होतो. तसेच, जास्त जाहिराती असणारे अॅप डाऊनलोड करणे शक्यतो टाळा. जर तुम्ही हे अॅप वापरणे बंद केले तर डेटा वाया जाणार नाही.
डेटा मर्यादा सेट करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला डेटा वापर पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला डेटा लिमिट आणि बिल सायकलवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही डेटा सेट करू शकता. जसे तुम्ही 1GB केले आहे, 1GB संपल्यानंतर इंटरनेट बंद होईल.
मोबाईल डेटा चालवताना मागे अनेक अॅप असतात, जे आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे या पद्धतीत बदल करणे योग्य ठरेल, असे वाटते. यासाठी तुम्हाला ऑटो अपडेट अॅप ओव्हर वायफाय ओन्ली सिलेक्ट करावे लागतील. असे केल्याने, तुमच्या फोनचे अॅप फक्त वाय-फाय वर अपडेट होतील.
डेटा सेव्हर मोड स्मार्टफोनमध्ये येतो. जेव्हा आपण इंटरनेट वापर करत असतो तेव्हा डेटा जतन करण्यात मदत होते. यातून भरपूर डेटा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. तुम्ही तुमच्या फोनमध्ये डेटा सेव्हर मोड चालू ठेऊ शकता.
इंटरनेट डेटाच्या अतिवापराने होतोय त्रास..? ; मग, ‘या’ सोप्या पद्धती ठरतील फायदेशीर; जाणून घ्या..