Smartphone Care Tips : स्मार्टफोन महाग असो किंवा स्वस्त प्रत्येकालाच डिव्हाइस हँग होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे का की स्मार्टफोन तुमच्या काही चुकांमुळे सुद्धा हँग होतो. स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करतो, मात्र स्मार्टफोनसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी न घेतल्यास पोन लवकर खराब होतो. फोनमधील कॅशे फाइल्स साफ करणे ही एक चांगली सवय असू शकते.
तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की जेव्हाही आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा तो सुरुवातीला खूप व्यवस्थित असतो. फोन हँग होणे, स्लो होणे यांसारख्या समस्या अजिबात येत नाहीत.
जसाजसा स्मार्टफोन जुना होऊ लागतो, अॅप क्रॅश, ब्लॅक स्क्रीन, स्लो परफॉर्मन्स, स्टोरेज आणि बॅटरीशी संबंधित समस्या त्यात येऊ लागतात.
स्मार्टफोन महाग असो वा स्वस्त, डिव्हाइस हँग होण्याची समस्या प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याला भेडसावत असते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या स्टोरेजशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास स्मार्टफोन दीर्घकाळापर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय ऑपरेट करता येतो.
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
स्मार्टफोनबाबत प्रत्येक युजरची गरज वेगळी असते. अशा परिस्थितीत जर नवीन स्मार्टफोन फक्त कॉल, इंटरनेट वापरण्यासाठी हवा असेल तर रॅम आणि इंटरनल स्टोरेजची फारशी चिंता न करता तुम्ही ७ ते १५ हजार किमतीत फोन खरेदी करू शकता.
जर तुम्हाला गेम, फोटोग्राफी, रील्स बनवण्याची किंवा दिवसभर फोन वापरण्याची आवड असेल तर चुकूनही कमी बजेटचा फोन खरेदी करू नका. प्रथम फोनसाठी बजेट बनवा, त्यानंतर अधिक रॅम आणि अंतर्गत स्टोरेज असलेल्या फोनची यादी तपासा. यासाठी 15 हजारांवरील उपकरण खरेदी करा. फोन हँग होण्यापासून वाचविण्यासाठी डिव्हाइसच्या स्टोरेजबाबत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे
फोन डेटा
फोनवरील न वापरलेला डेटा हटवण्याची सवय लावा. अनेक वेळा फोनमध्ये असे स्क्रीनशॉट्स, अस्पष्ट फोटो आणि असे डॉक्युमेंट्स असतात, जे फोनचे स्टोरेजच भरत असतात. हा डेटा फोनमध्ये ठेवू नका.
फोन अॅप
फोनवर जास्त अॅप डाऊनलोड करू नका. जर तुम्ही आवश्यक अॅप फोनमध्ये ठेवले तर तुम्हाला डिव्हाइसच्या स्टोरेजची चिंता होणार नाही. फोनमध्ये फक्त एक वेळच्या गरजेसाठी अॅप्स इन्स्टॉल करू नका. त्याऐवजी तुम्ही वेब अॅप्स वापरू शकता.
बॅकग्राउंड अॅप
बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप काढून टाकण्याची सवय लावा. या सवयीमुळे तुम्ही स्मार्टफोनचे सर्व अॅप जलद स्विच करताना वापरू शकता.
फोन कॅशे फाइल
फोनमधील कॅशे फाइल्स वेळोवेळी साफ करत राहा. या सवयीने तुमच्या फोनची जागा मोकळी होईल.
स्मार्टफोन स्टोरेजबाबत या चुका करू नका
फोन मेसेज बॉक्स
मेसेज बॉक्समधील ओटीपी आणि कंपनीकडून येणारे रँडम मेसेज फोनचे स्टोरेज भरतात. अशा स्थितीत अनेक यूजर्स मेसेज बॉक्समधील हे मेसेज डिलीट करत नाहीत. फोनचा मेसेज बॉक्स भरू देऊ नका, गरज संपताच मेसेज डिलीट करा.
सिस्टम अपडेट सूचना
अनेक वापरकर्ते फोनवर सिस्टमवरून येणाऱ्या अपडेट सूचनांकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या फोनवरील सर्व अॅप व्यवस्थित चालण्यासाठी फोनची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटेड असणे आवश्यक आहे.
क्लाउड स्टोरेज
फोनच्या गॅलरीत फोटो आणि व्हिडिओ सेव्ह केले तर डिव्हाईसचे स्टोरेज भरले जाईल. त्याऐवजी क्लाउड स्टोरेज वापरा. फोनचे मुख्य स्टोरेज सेव्ह करून क्लाउड स्टोरेजमध्ये फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करा. तुम्ही फोटो आणि व्हिडिओंसाठी Google Photos वापरू शकता.
अॅनिमेशन
काही स्मार्टफोनमध्ये अॅनिमेशनची सुविधा असते. अॅनिमेशनमुळे स्मार्टफोन हँग होतो हे फार कमी वापरकर्त्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीत ही सेटिंग बंद ठेवणे शहाणपणाचे आहे.