Smartphone Buying Tips : वापरकर्त्यांनो, नवीन फोन खरेदी केलाय? लगेचच करा ‘या’ गोष्टी, नाहीतर होईल मोठे नुकसान

Smartphone Buying Tips : सध्या बाजारात अनेक कंपन्या आपले स्मार्टफोन लाँच करत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी केला असेल तर तुम्हाला काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

डेटा करा ट्रान्सफर

  • जुन्या फोनवरून नवीन फोनमध्ये डेटा म्हणजे तुमच्या फोनमध्ये असणारे संपर्क, फोटो, व्हिडिओ इ. ट्रान्सफर करा.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही Google Drive, iCloud किंवा इतर कोणतीही क्लाउड स्टोरेज सेवा वापरून डेटाचा बॅकअप आणि पुनर्संचयित देखील करू शकता.

सिम कार्ड घालून करा सेटअप

  • हे लक्षात घ्या की नवीन फोनमध्ये सिम कार्ड घाला आणि तुमचा मोबाइल नंबर सक्रिय करा.
  • इंटरनेट सेट करा किंवा हा फोन वाय-फायशी देखील कनेक्ट करा.
  • Google Play Store किंवा App Store वरून आवश्यक तसेच आवडते ॲप डाउनलोड करा.

सॉफ्टवेअर करा अपडेट

  • तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व सॉफ्टवेअर आणि ॲप्स अपडेट करा.
  • असे केले तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नवीनतम सुरक्षा पॅच आणि फीचर्स मिळतील.

स्क्रीन प्रोटेक्टर आणि बॅक कव्हर

  • नवीन फोन स्क्रॅच आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी स्क्रीन प्रोटेक्टर आणि बॅक कव्हर स्थापित करणे गरजेचे आहे.
  • बाजारात अनेक प्रकारचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि बॅक कव्हर्स उपलब्ध असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार सर्वात उत्तम निवडू शकता.

सुरक्षा सेटिंग्ज

  • तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षा सेटिंग्जवर जा आणि पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सेट करा.
  • फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन सारखी बायोमेट्रिक सुरक्षा सक्रिय केली जाईल.
  • फाइंड माय डिव्हाईस सारख्या सेवा सक्रिय करा, जेणेकरून फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
  • इतकेच नाही तर फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवा आणि फक्त अधिकृत चार्जर किंवा केबल वापरा. याशिवाय अज्ञात स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करू नका.

Leave a Comment