Smart TV Offer : आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही पाहायला मिळतात. मागणी जास्त असल्याने या स्मार्ट टीव्हीच्या किमती खूप जास्त असतात. पण तुम्ही आता Amazon आणि Flipkart वरून टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
कोडक 24 इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही
किमतीचा विचार केला तर या टीव्हीची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. कंपनीने टीव्हीमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह HD रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असून लिनक्स ओएसवर काम करणारा हा टीव्ही 20 वॅटचा ध्वनी आउटपुट देतो. यामध्ये तुम्हाला YouTube, Zee5, प्राइम व्हिडिओ आणि Sony Liv सारखे अंगभूत ॲप्स मिळत आहेत. तुम्हाला हा टीव्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
थॉमसन अल्फा 24 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही
किमतीचा विचार केला तर थॉमसनचा हा टीव्ही तुम्हाला 5,999 रुपयांना मिळेल. या टीव्हीमध्ये कंपनी 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह HD रेडी डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर त्याचे ध्वनी आउटपुट 20 वॅट्स इतके आहे. हा टीव्ही Linux OS वर काम करतो. यात तुम्हाला प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारखे बिल्ट ॲप्स मिळतील. तुम्हाला हा टीव्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
Blaupunkt Sigma 24 इंच HD रेडी LED स्मार्ट लिनक्स टीव्ही
किमतीचा विचार केला तर हा टीव्ही फ्लिपकार्टवर 6299 रुपयांच्या किंमतीला खरेदी करता येईल. कंपनीचा हा सिग्मा स्मार्ट टीव्ही क्वाड-कोअर प्रोसेसरने सुसज्ज असून टीव्ही 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला 20 वॅटचा साउंड आउटपुट मिळेल. हा एलईडी स्मार्ट टीव्ही लिनक्स ओएसवरही काम करेल.
VW 32 इंच फ्रेमलेस सीरीज HD रेडी LED TV VW32A
किमतीचा विचार केला तर हा फ्रेमलेस सीरीज एचडी टीव्ही Amazon India वर 6,799 रुपयांना खरेदी करता येईल. TV मध्ये कंपनी 60Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देत असून या HD रेडी डिस्प्लेचा व्ह्यूइंग अँगल 178 अंश इतका आहे. पॉवरफुल साउंडसाठी, तुम्हाला या टीव्हीमध्ये पॉवरफुल स्टीरिओसह 20 वॉटचा साउंड आउटपुट मिळेल. महत्त्वाचे म्हणजे कंपनी टीव्हीसोबत 1 वर्षाची वॉरंटी देत आहे.