Smart TV Offer : हल्ली सर्वचजण स्मार्ट टीव्ही खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे स्मार्ट टीव्ही निर्माता कंपन्या देखील शानदार फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच करू लागल्या आहेत. तुम्ही आता सोनी आणि सॅमसंगचे 50 इंच स्मार्ट टीव्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. amazon वर अशी संधी मिळत आहे.
सॅमसंग 50 इंच क्रिस्टल iSmart 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही UA50CUE60AKLXL
कंपनीचा हा स्मार्टटीव्ही तुम्हाला 42,990 रुपयांना खरेदी करता येईल. सवलतीचा विचार केला तर या टीव्हीवर 3 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. या टीव्हीवर 2710 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. टीव्हीचा EMI 2084 रुपयांपासून सुरू होतो. या टीव्हीमध्ये तुम्हाला 50Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळत असून टीव्हीमध्ये अडॅप्टिव्ह साउंडसह 20 वॅट स्पीकर सेटअप मिळेल.
सोनी ब्राव्हिया 50 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी Google TV KD-50X70L
किमतीचा विचार केला तर या टीव्हीची किंमत सेलमध्ये 55,090 रुपये झाली आहे. बँक ऑफर्समध्ये टीव्ही 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत आणखी 2710 रुपयांनी कमी करता येईल. टीव्हीची ईएमआय 2671 रुपयांपासून सुरू होऊन टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. शक्तिशाली आवाजासाठी या टीव्हीमध्ये ओपन बॅफल स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओसह 20-वॉट स्पीकर सेटअप मिळेल.
Sony Bravia 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV KD-50X64L
सेलमध्ये या टीव्हीची किंमत 54,990 रुपये असून यावर ३ हजार रुपयांपर्यंत बँक सवलत मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये त्याची किंमत 2710 रुपयांपर्यंत कमी करता येईल. हा टीव्ही तुमचा 2,666 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. हा टीव्ही ओपन बॅफल स्पीकरने सुसज्ज असून तो डॉल्बी ऑडिओ आणि 20 वॉट स्पीकर सेटअपसह येतो.