Smart TV : स्वस्तात घरी आणा 55 इंच टीव्ही! LG, Samsung आणि Sony मॉडेल्सवर मिळतेय बंपर सवलत

Smart TV : तुम्ही आता खूप कमी किमतीत LG, Samsung आणि Sony मॉडेल्सचे टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीवर तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल. कसे ते जाणून घ्या.

सोनी ब्राव्हिया 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही ऑफर

कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 55-इंचाचा डिस्प्ले देतो, जो 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशनसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट आहेत. किमतीचा विचार केला तर टीव्हीची किंमत 57,990 रुपये आहे आणि त्यावर 1000 रुपयांचे कूपन डिस्काउंट उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्ससह 2,000 रुपयांची अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे. या टीव्हीला Amazon Prime Video, Netflix आणि Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश आहे.

सॅमसंग 55 इंच क्रिस्टल व्हिजन स्मार्ट टीव्ही ऑफर

सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी तीन HDMI पोर्ट आणि एक USB पोर्ट दिले आहे. हा टीव्ही Netflix, प्राइम व्हिडिओ, SonyLiv, Disney+Hotstar आणि Samsung TV Plus सारख्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो. किमतीचा विचार केला तर टीव्हीची किंमत 44,990 रुपये इतकी आहे परंतु बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर 3,000 रुपयांची सूट तुम्हाला मिळेल.

LG 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही ऑफर

प्रीमियम ब्रँड LG चा मोठा स्मार्ट टीव्ही WebOS SmartTV सॉफ्टवेअरवर काम करेल आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 3840×2160 पिक्सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने+ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओ सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. त्यात तीन HDMI पोर्टसह दोन USB पोर्ट आहेत. याची किंमत 42,990 रुपये असली तरी तुम्ही बँक कार्डच्या मदतीने पेमेंट केले तर 3,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे.

Leave a Comment