Smart Phone Important Function : फोनचा वापर सातत्याने वाढत आहे. आता प्रत्येक (Smart Phone Important Function) कामासाठी फोन हा गरजेचा ठरत आहे. फोन नवा असला तर मग विचारायलाच नको. पण फोन जसा जुना होऊ लागतो तसतसे त्यात काही समस्या दिसू लागतात. बऱ्याच वेळा फोनमध्ये अशा काही समस्या निर्माण होतात ज्यामुळे फोन स्लो होण्याचे प्रमाण वाढते. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकदा फोन बंद करून पुन्हा चालू केला जातो. त्यानंतर फोन व्यवस्थित काम करू लागतो. फोनमध्ये पावर ऑफ आणि रिस्टार्ट असे दोन पर्याय दिले जातात. पावर ऑफ केल्याने फोन बंद होतो आणि तुम्हाला तो पुन्हा सुरू करावा लागतो. परंतु रिस्टार्ट केल्यावर फोन आपोआप बंद होऊन पुन्हा आपोआप सुरू होतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का या दोन्ही वैशिष्ट्यांचे काम सारखेच आहे. दोन पर्याय देण्याचा फायदा आहे आणि या दोन पर्यायांमुळे फोनमध्ये काय होते. तुमचा फोन दर आठवड्याला रिस्टार्ट केल्याने मेमरी लीक होण्यापासून रोखण्यास मदत होते. बॅटरीज प्लसने जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की ज्यावेळी एखाद्या ॲपला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेमरीची आवश्यकता निर्माण होते त्यावेळी मेमरी लीक होण्याचा धोका जास्त असतो. परंतु ज्यावेळी ॲप वापरात नसते त्यावेळी सुद्धा फोन मेमरी मोकळी राहत नाही.
Smartphone Offer : स्वस्तात खरेदी करा iPhone 15 आणि Galaxy S23 Ultra, या ठिकाणी मिळतेय संधी
Smart Phone Function
मोबाईल फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटी समस्यांमध्ये मदत मिळू शकते. जुने स्मार्टफोन कधी कधी डेटा आणि वायफाय कनेक्ट होण्यास अक्षम असतात आणि फोन रिस्टार्ट केल्यानंतर पुन्हा कनेक्ट करावे लागतात. फोन स्विच ऑफ केल्याने त्यातील कॅशे डेटा साफ होण्यास मदत होईल. ज्यामुळे तुमचा फोन अधिक वेगाने ऑपरेट होण्यास मदत होईल.
फोन स्विच ऑफ आणि रिस्टार्ट करण्याकरिता तुम्ही फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेले ॲप्स क्लिअर करत रहावे. फोन रिस्टार्ट करण्याची गरज तेव्हा भासते जेव्हा फोन हँग होण्याची समस्या वाढलेली असते. मोबाईलमधील ॲप नीट काम करत नाहीत त्यावेळीही फोन रिस्टार्ट करावा लागतो. फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या निर्माण झाल्यासही बऱ्याचदा फोन रिस्टार्ट करावा लागतो. परंतु मधूनमधून अशा पद्धतीने फोन रिस्टार्ट करत राहणे फायद्याचे ठरू शकते ज्यामुळे फोन व्यवस्थित चालू राहण्यास मदत मिळते.
Smart Phone Function
iQOO Smartphone : लवकरच लाँच होणार iQOO चा जबरदस्त फोन, किंमत आहे फक्त..