Small Business Idea For Diwali : अहमदनगर : दिवाळी सण (Diwali Festival 2022) अगदी जवळ आला आहे. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी उत्साहात साजरी करायची असेच प्रत्येकाचे नियोजन आहे. त्यामुळे खरेदीही दणक्यात होणार आहे. नवे कपडे, पणत्या, आकाश कंदिल, फटाके या सर्व वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. या काळात जर तुम्हीही अगदी कमी पैशांत काही Business सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आम्ही तुमच्यासाठी काही कमी (Small Business Idea) भांडवलात सुरू करता येणाऱ्या व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहेत हे व्यवसाय..
आकाश कंदिल तयार करणे
दिवाळी आहे आणि घरासमोर आकाश कंदिल नाही असे कधीच होत नाही. आकाश कंदिल खरेदी केला जातोच. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय काही काळासाठी सुरू करू शकता. यासाठी जास्त भांडवलाचीही गरज नाही. विविध रंगांचे आणि आकारांचे आकाश कंदिल तयार करून विक्री करता येऊ शकते. आता तर आकाश कंदिल तयारही मिळतात. तुम्हाला फक्त बाजारपेठेत त्याची विक्री करायची आहे. तुम्ही स्वतः किंवा अन्य एखाद्या व्यक्तीला काम देऊन तुम्ही आकाश कंदिलांची विक्री करू शकता. यासाठी तुम्ही सध्याच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेऊ शकता. आपल्या मित्र मंडळी, नातेवाईकांनाही याबाबत माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून तुम्ही बिजनेस आणखी वाढवू शकता.
पणत्या विक्री करणे
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. या काळात प्रत्येक घर प्रकाशमान झालेले दिसते. अर्थातच त्यासाठी पणती असतेच. सायंकाळच्या वेळी प्रत्येक घरात, घरामोरच्या अंगणात पणत्या ठेवल्या जातात. या दिवसात पणती असतेच. त्यामुळे लोक आवर्जून खरेदी करतात. आता तर रेडिमेड पणत्या मिळतात. त्यामुळे तुम्हाला पणत्या तयार करण्याची गरज नाही. तुम्ही ठोक भावात पणत्या खरेदी करून स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करू शकता. या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता.
वाहने साफसफाईचा व्यवसाय
हा व्यवसायही दिवाळीच्या काळात तुमची भरभराट करून जाईल. आज प्रत्येकाकडे एखादे तरी वाहन आहे. दिवाळीच्या सणात वाहनांची (Vehicle Washing Centre) साफसफाईकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी वाहने धुण्यासाठी गर्दी होत असते. या दिवसात तुम्ही एखादे वॉशिंग सेंटर सुरू करू शकता. तसे तर हा व्यवसाय कायम स्वरुपी चालणारा आहे. मात्र दसरा, दिवाळीच्या काळात आधिक उत्पन्न मिळवून देणारा आहे. त्यामुळे या दिवसात तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल थोडे जास्त लागेल. जागेचीही आवश्यकता राहिल. मात्र, या अडचणींवर मात करून जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकलात तर उत्पन्न चांगले मिळत राहिल आणि आर्थिक स्थैर्यही मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही दरमहा किमान 15 हजार रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करू शकता.
हार फुले उटणे
दिवाळीच्या सणात फुलांना (Flowers) मागणी जास्त असते. उटण्यालाही वेगळे महत्व आहेच. लोक या गोष्टी खरेदी करणारच. तेव्हा तुम्ही या वस्तू विक्री करण्याचा विचार केलात तर नुकसान होणार नाही. कारण, या वस्तू दिवाळीत विकल्या जातात. तुम्हाला फक्त बाजारपेठे शोधून त्याची विक्री करायची आहे. यासाठी जास्त भांडवलाचीही गरज नाही.
- Read : Business Idea: आजच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय अन् दरमहा कमवा 10 लाख रुपये
- Diwali Bonus: ऐन महागाईत ‘त्या’ केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात; पहा किती मिळाला बोनस
- Business : पावसाळ्यात सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल चांगल्या उत्पन्नाची हमी; जाणून घ्या..
- Business Idea: सुरू करा ‘हा’ फायदेशीर व्यवसाय झाडापासून मिळणार 6 लाख रुपये; जाणून घ्या शेतीची पद्धत