Sleep paralysis : अनेकजणांना असे आजार होतात ज्याकडे आपण वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा आपल्याला खूप मोठा फटका बसतो. यापैकी एक आजार म्हणजे स्लिप पॅरालिसिस होय. तुम्हाला जर लक्षणे दिसली तर लगेच उपचार घ्या.
स्लिप पॅरालिसिस
स्लीप पॅरालिसिस ही अशी स्थिती आहे ज्यात एखादी व्यक्ती झोपेत असताना थोड्या काळासाठी हालचाल करू शकत नाही तसेच काहीही बोलू शकत नाही. हे सहसा काही सेकंद किंवा मिनिटे सुरु असते, परंतु काही प्रकरणांमध्ये ते 10 मिनिटांपर्यंत टिकते.
जाणून घ्या लक्षणे
- विचित्र आवाज ऐकायला येणे.
- शरीराची हालचाल कमी होणे
- सतत धाप लागणे
- झोपेत असताना जागे होणे
- भीती
- एखाद्याचा दबाव जाणवणे
कारणे
हे लक्षात घ्या की स्लिप पॅरालिसिसची अनेक कारणे असू शकतात. समजा आपण त्यापैकी काहींबद्दल बोललो तर, झोप न लागणे, तणाव, झोपेचे चक्र बिघडणे इ. अनेकवेळा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही स्लिप पॅरालिसिस होतो. तसेच, कधीकधी मेंदूचे संतुलन बिघडणे हे स्लिप पॅरालिसिसचे कारण असते.
असे टाळा
ही समस्या टाळण्याचा चांगला मार्ग म्हणजे पुरेशी झोप घेणे आणि झोपेचे चक्र व्यवस्थित ठेवणे. हे लक्षात घ्या की तुमच्या दैनंदिन जीवनात तणाव कमी करणारा योगाचा समावेश करणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे असे होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करा.
स्लिप पॅरालिसिस दरम्यान करा हे
समजा एखाद्याला स्लिप पॅरालिसिस असेल तर सर्वात अगोदर शांत राहा, कारण तो सहसा 2-5 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाही. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका. या दरम्यान हळूहळू तुमची बोटे आणि पाय हलवून श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्लिप पॅरालिसिस ही गंभीर स्थिती नसली तरी ती भीतीदायक आहे, जर परिस्थिती गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.