तालुक्यात सोमवारी तासभर रिमझिम तर मंगळवारी पहाटे चार वाजेपासून सात वाजेपर्यंत तीन तास (३९.१७ मिमी) पाऊसाची नोंद झाला. या पावसामुळे शेतातील फुटलेला कापूस ओला झाला तर मका, सोयाबीन पीक जमिनीवर काढून ठेवले असल्याने ते जागेवरच कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. पाचाेरा बाजार समितीसह इतर खरेदी केंद्रांवरील व्यापारी, शेतकऱ्यांचा मका भिजल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सर्वाधिक ६० मि.मी. पावसाची नोंद पाचोरा मंडळात करण्यात आली आहे
नगरदेवळा परिसरातही सलग दोन दिवस पाऊस; पिकांचे प्रचंड नुकसान नगरदेवळा व इतर परिसरात सामवारी दुपारी झालेल्या तीन तास तर मंगळवारी भल्या पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जोरदार पावसामुळे वेचणीला आलेला कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद इ . सर्व पिकांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. ऐन दिवाळी सणावेळी शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक संकट ओढवले असताना दिवाळीचा सण कसा साजरा करावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे ,तर दिवाळी अंधारातच साजरी हाेणार असे चित्र दिसत आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना खासदार, आमदार व विमा कंपनी यांनी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी नगरदेवळ्यासह सर्व परिसरातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान कापूस वेचणीवर आणि अन्य पिके काढणीवर आल्याने परतीचा पाऊसही आता कायमचा थांबावा, अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.
- Nanded Rain : जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा, कापसाच्या वाती झाल्या तर सोयाबीनला फुटले कोंब
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर
- Women in Defense :भारतीय सैन्यातील नारी, शत्रूंवर भारी
दरम्यान सलग दोन दिवस पाऊस झाल्याने बी-बियाणे, खते, औषधे, निंदणी, कोळपणी यासाठी हजारो रुपये खर्च करून हाती आलेले पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दिवाळी सण तोंडावर आल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व स्थरातून केली जात आहे.पाचोरा बाजार समितीत व्यापाऱ्यांचा हजारो क्विंटल मका भिजला मंगळवारी सकाळी अचानक पाऊस झाल्याने येथील बाजार समितीमध्ये तसेच ठिकठिकाणच्या इतर मका खरेदी केंद्रावर शेतकरी व व्यापाऱ्यांचा हजारो क्विंटल मका भिजला त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे