Skoda Kushaq Onyx : लाँच झाली सर्वात स्वस्त स्वयंचलित SUV, कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

Skoda Kushaq Onyx : भारतीय बाजारात सर्वात स्वस्त स्वयंचलित SUV लाँच झाली आहे. या कारमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. बाजारात Skoda ने आपली Skoda Kushaq Onyx लाँच केली आहे.

कसे आहे इंजिन?

नवीन Skoda Kushaq Onyx मध्ये 3 सिलेंडर, 1.0 TSI टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या या कारमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आला आहे. या इंजिनच्या मदतीने हे वाहन प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी करते. कुशाकला क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

प्रौढ सुरक्षेमध्ये Skoda Kushaq Onyx 34 गुणांपैकी 29.64 गुण मिळवले आहेत. तसेच बालसुरक्षेत Skoda Kushaq Onyx ला 49 पैकी 42 गुण मिळाले आहेत. ही मेड इन इंडिया कार आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

Skoda Kushaq Onyx मध्ये हिल होल्ड कंट्रोल, 2 स्पोक, फूट शिफ्ट, लेदर स्टीयरिंग आणि Onyx थीम यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. कंपनीने ते MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित केले असून सध्या, कंपनी पुढील वर्षी लॉन्च होणाऱ्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर काम करत आहे.

तसेच या एसयूव्हीच्या आधारे कंपनी संपूर्ण कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करू इच्छित आहे, असे सांगितले जात आहे. नवीन Kushaq Onyx ची भारतातील विद्यमान मारुती सुझुकी Brezza, Hyundai Venue, Kia Sonet आणि Tata Nexon यांच्याशी स्पर्धा होईल. पण आता स्कोडाच्या या नव्या एसयूव्हीला कितपत यश मिळते हे पाहावे लागणार आहे.

Leave a Comment