Skin Care Tips in Summer : उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी; ‘या’ टिप्स करतील मोठ्ठी मदत

Skin Care Tips in Summer : आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care Tips in Summer) घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांत उन्हामुळे त्वचा काळी पडणे, त्वचेवर फोड येणे, त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे या समस्या जाणवतात. त्वचेची देखभाल करण्यासाठी मग हजारो रुपये खर्च केले जातात. परंतु, हा खर्च टाळण्याचा एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही खास पद्धतींचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. त्वचेच्या समस्या देखील कमी करू शकता.

हिवाळ्यात दिवसातून शक्यतो एकदाच अंघोळ केली जाते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा वापर वाढतो. अनेकजण दिवसातून दोन वेळा अंघोळ करतात. अशा वेळी त्वचेचीही काळजी घेतली गेली पाहिजे. दिवसातून किमान दोन वेळा चेहरा धुवायला हवाय. यासाठी तुमच्या त्वचेचा प्रकार पाहून योग्य फेस वॉश निवड करा.

Skin care Tips: त्वचा तरुण ठेवायचीय? तर आहारात करा ‘या’ 3 फळांचा समावेश

Skin Care Tips in Summer

सनस्क्रीन वापरा

सनस्क्रीनचा वापर प्रत्येक ऋतुत आवश्यक असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत त्याची गरज जास्त वाढते. सनस्क्रीन उन्हापासून त्वचेचे रक्षण तर करतेच शिवाय प्रदूषण आणि अन्य घटकांपासून संरक्षण देते. या पद्धतीचा वापर केला तर तुमच्या त्वचेसाठी आधिक फायदेशीर ठरेल. उन्हाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावण्याचे तज्ज्ञ देखील सांगतात.

पाणी प्या

उन्हाळ्यात तहान जास्त लागते. त्यामुळे शरीरात जास्त पाणी जाते. डिहायड्रेटेड त्वचेची समस्या निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी प्या. यामुळे त्वचेलाही फायदा होईल आणि चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होईल. दिवसातून योग्य प्रमाणात पाणी पिल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे रोज किती पाणी पिणे आवश्यक आहे याची माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता.

Skin care tips । वयाच्या तिशीनंतर रोज प्या ‘हा’ खास चहा, चेहरा राहील चमकदार आणि तरुण

टीप: या लेखात नमूद केलेली माहिती आणि सूचना फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने आहेत. त्यांचा व्यावसायिक वैद्यकिय मार्गदर्शन म्हणून अर्थ घेऊ नका. आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असेल तर नेहमी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. 

Leave a Comment