Skin Care Tips in Summer | उन्हाळ्यात तेलकट त्वचा करतेय हैराण? डोन्ट वरी, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय कराच!

Skin Care Tips in Summer : कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. एप्रिल महिन्यातील (Skin Care Tips in Summer) रणरणचं ऊन चांगलंच जाणवू लागलं आहे. देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की लोकांनी आतापासूनच खाण्याच्या सवयी आणि अन्य गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या दिवसात तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. या ऋतूत सामान्य त्वचेच्या लोकांच्याही त्वचेला जास्त तेल सुटते अशा परिस्थितीत ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकणे इतके सोपे नाही. परंतु तुम्हाला वाटत असल्यास काही गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर या समस्येपासून नक्कीच आराम मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही फेस पॅकबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर केल्यानंतर तुम्हाला तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यास नक्कीच मदत मिळेल.

Skin care tips । वयाच्या तिशीनंतर रोज प्या ‘हा’ खास चहा, चेहरा राहील चमकदार आणि तरुण

Skin Care Tips in Summer

काकडी आणि मध

काकडी आणि मधामध्ये अनेक घटक आढळतात. जे त्वचेला आराम देतात हा पॅक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात काकडी किसून घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिसळा आता ते चांगले मिक्स करून घ्या आणि नंतर चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दहा मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा उजळलेला दिसेल आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही निघून जाईल.

दही आणि हळद

त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी दही हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अशा स्थितीत एका भांड्यात दही घ्या आणि त्यात थोडा मध आणि चिमूटभर हळद टाका. हा पॅक नियमितपणे वापरल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Skin care Tips: त्वचा तरुण ठेवायचीय? तर आहारात करा ‘या’ 3 फळांचा समावेश

Skin Care Tips in Summer

गुलाब पाणी आणि मध

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी खूप उपयुक्त ठरते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी गुलाब पाण्यामध्ये थोडा मध मिसळून वापरू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात नक्कीच बदल झालेला जाणवेल.

ओट्स आणि दूध

हा पॅक तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ओट्स व्यवस्थित बारीक करून घ्यावे लागतील. ओट्स बारीक केल्यानंतर त्यात कच्चे दूध टाका आणि काही वेळ चेहऱ्यावर लावा. हा पॅक तुम्हाला चेहऱ्याला थंडावा देईल आणि त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करेल.

Leave a Comment