Skin care Tips: त्वचा तरुण ठेवायचीय? तर आहारात करा ‘या’ 3 फळांचा समावेश

Skin care Tips: प्रत्येकजण चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या मेकअपने (Makeup tips) लपवण्याचा प्रयत्न करतात. तरूण रहायला, दिसायला सगळ्यांना आवडत असते. यासाठी योगा, व्यायाम आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तुम्हीही घरबसल्या त्वचा तरुण ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात अशा फळांचा समावेश करावा लागेल. (Skin care Tips in Marathi)

निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली असून फळे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने त्वचा हायड्रेट राहते. ही फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी भरलेली असल्याने तुमच्या त्वचेला पोषण देतात.

बेरी (berry)

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि गोजी बेरी ही फळे त्यांच्या समृद्ध अँटिऑक्सिडंट्ससाठी प्रसिद्ध असून ती शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. तसेच ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून छिद्र उघडतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. कारण यात असे एन्झाईम आढळतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून चेहऱ्यावर चमक वाढवतात. नवीन पेशी वाढवून त्वचेचा पोत सुधारतो.

संत्री (orange)

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने ते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे जीवनसत्व आहे. कोलेजन संश्लेषणासाठी व्हिटॅमिन सी  गरजेचे असून ते त्वचा घट्ट ठेवते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या रोखते. त्यामुळेच त्वचा लवचिक आणि तरुण राहते. व्हिटॅमिन सी त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करत असून संत्र्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करतात.

सफरचंद (apple)

सफरचंदमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, बी यासह अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. शरीरातील वृद्धत्व वाढवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जबाबदार असून पेशींना हानी पोहोचवण्याबरोबरच, यामुळे आपल्या त्वचेचे अकाली वृद्धत्व होते. अशा वेळी सफरचंदात असणारे पोषक तत्व या फ्री रॅडिकल्सशी लढून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात.

Leave a Comment