Skin Care Tips : सध्या हवामान बदलते आहे. त्यामुळे मानवी त्वचेतही (Skin Care Tips) काही बदल होत आहेत. काही समस्याही जाणवत आहेत. या दिवसात त्वचा कोरडी, निर्जीव, मुरुम आणि पुरळांनी भरलेली दिसते. बहुतेकांना ही समस्या जाणवत आहे. तु्म्हालाही अशीच समस्या जाणवत असेल तर काळजी करू नका. आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुमचा चेहरा स्वच्छ होईल तसेच चेहऱ्याचा रंगही उजळेल. मुरुम आणि पुरळ या समस्याही कायमच्या दूर होतील. चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत या खास टिप्स..
मुलतानी माती
जर तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल तर 250 ग्रॅम मुलतानी माती, तितकीच चंदन पावडर आणि 50 ग्रॅम हळद मिसळा. नंतर चमच्याने ढवळून त्याची पेस्ट तयार करा. यामुळे पिंपल्स तर दूर होतीलच शिवाय चेहरा उजळ होईल आणि चेहरा अगदी साफ दिसेल.
पुदीना
चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम दूर करण्यासाठी पुदीना एक प्रभावी उपाय आहे. जर तुमचा चेहरा देखील या कारणांमुळे खराब होत असेल तर दररोज पुदीना पेस्ट तयार करून चेहऱ्यावर काही वेळ ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय करून पाहा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक नक्कीच जाणवेल.
बेसन
चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बेसन देखील खूप प्रभावी आहे. ते वापरण्यासाठी प्रथम बेसनाचे पीठ ताकात मिसळून घ्या, नंतर चेहऱ्याला चांगले लावा. काही दिवसात पिंपल्स कायमचे गायब होतील आणि चेहराही उजळेल. या घरगुती उपायासाठी फारसा खर्चही येणार नाही. तसेच कोणते साइट इफेक्टही नाहीत.
काळी मिरी
चेहरा स्वच्छ करण्यासाठीही काळी मिरी खूप गुणकारी आहे. याचा वापर गुलाब पाण्यासोबत करा. यासाठी प्रथम वीस काळ्या मिर्या घ्याव्यात, नंतर गुलाब पाण्यात बारीक करून रात्री चेहऱ्यावर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा. यामुळे मुरुम, डाग आणि सुरकुत्या दूर होतात आणि चेहरा चमकू लागतो.
कडुलिंब
कडुलिंब त्वचेतील तेल काढून टाकते. यासाठी तुम्ही तुमचा चेहरा कडुलिंबाच्या साबणाने धुऊन घेत चला. कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने चेहरा धुऊन देखील याचा वापर केला जाऊ शकतो. जेव्हा त्वचेवर तेल नसते तेव्हा मुरुमे होण्याची शक्यताही अगदीच कमी असते.