Skin Beauty Tips : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळविण्यासाठी त्वचेची विशेष काळजी (Skin Beauty Tips) घेणे आवश्यक आहे. चांगलं दिसण्यासाठी जेवढं चांगलं खाणं आवश्यक आहे, तितकंच महत्त्वाचं तुमची जीवनशैलीही आहे. यासोबतच जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपायांचा वापर केलात तर तुमची त्वचा अधिक सुंदर दिसू शकते. बदलत्या ऋतूंचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो, पण जर आपण नियमित त्वचेची काळजी घेतली तर प्रत्येक ऋतूत ती चमकदार दिसते. तर तुम्हाला अशाच काही ब्युटी टिप्स देणार आहोत.
त्वचा स्वच्छ ठेवा
दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री) त्वचा स्वच्छ करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार कोरडे किंवा तेलकट खास फेसवॉश वापरा. कोमट पाणी वापरा, गरम पाणी त्वचेतील तेल काढून टाकू शकते.
टोनिंग
त्वचेचे घर्षण कमी करण्यासाठी व्यायाम, विशेषत: योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा. व्यायामाचा अभाव असल्यास शरीराची हालाचाल होत नाही. त्यामुळे त्वचेबरोबरच शरीराच्या अन्य अवयवांच्याही समस्या वाढत जातात. त्यामुळे हलका व्यायाम केल्यास फायद्याचे ठरेल.
दररोज 7 ते 8 तास झोप घ्या
दररोज 7-9 तास चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्वचेला त्याचा फायदा मिळेल आणि तरुण दिसू शकेल.
सिगारेट आणि दारू टाळा
धूम्रपान केल्याने त्वचा पातळ होते आणि कोलेजन आणि एलास्टिन फायबर्स यांचे नुकसान होते. अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते आणि सूज येऊ शकते. व्यसने नेहमीच शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे व्यक्ती अकाली वृद्ध दिसू लागते. निरोगी जीवन जगण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणेच चांगले.
नियमित व्यायाम
रक्त संचार सुधारण्यासाठी आणि त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये प्रदान करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करा. व्यायामामुळे तणाव कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतल्यास कोणत्याही ऋतूत तुमच्या त्वचेची चमक कायम राहते. हे असे घरगुती उपाय आहेत जे तुमच्या त्वचेवर वृद्धत्वाच्या रेषा दिसू देणार नाहीत.