SIP । सध्याच्या काळात पैशाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. त्यामुळे अनेकांना कमी वेळेत करोडपती व्हायचं असते. त्यासाठी अनेकजण काही योजनांमध्येही गुंतवणूक करतात. जर तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. अनेकजण SIP मध्ये पैसे गुंतवतात.
असे व्हा करोडपती
समजा तुम्ही रोज फक्त 10 रुपये वाचवू शकत असल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ योग्य नियोजन करावे लागणार आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. समजा तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले तर महिन्याभरात तुमचे 300 रुपये वाचू शकतात. तुम्हाला हे 300 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडातील लॉग टर्म गुंतवणूक जबरदस्त परतावा देत असून यात तुम्हाला 15 ते 20 टक्के रिटर्न मिळतील.
अशी करा सुरुवात
तुम्ही हे 300 रुपये SIP मध्ये गुंतवू शकता. समजा तुमचे वय 20 वर्षे आहे आणि तुम्ही SIP मध्ये 300 रुपये गुंतवले आहेत. तुम्ही गुंतवणूक 40 वर्षे केली तर तुमची एकूण गुंतवणूक 2,40,000 रुपये असेल. समजा तुम्हाला त्यावर १५ टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळाला तर 40 वर्षांत तुमचा अंदाजे परतावा 1,54,61,878 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एकूण मूल्य 1,57,01,878 रुपये होईल. तुम्ही सहज करोडपती होऊ शकता.
गुंतवणूक करणे सोपे
हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंड एसआयपी येथे गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. विविध लोकांच्या जोखीम क्षमतेनुसार आणि कार्यकाळानुसार म्युच्युअल फंडामध्ये खूप पर्याय आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच वेळी कोणतीही मोठी रक्कम गुंतवण्याची गरज पडत नाही.