SIP Tips : अवघ्या 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्हीसुद्धा होऊ शकता करोडपती, अशी करा सुरुवात

SIP Tips : अनेकांना कमी वेळेत करोडपती होण्याची इच्छा असते. पण त्यासाठी तशी मेहनत आणि गुंतवणूक करावी लागते. आता तुम्ही देखील काही पद्धतीने करोडपती होऊ शकता. कसे ते जाणून घ्या.

असे व्हा करोडपती

  • समजा तुमचे वय 20 असेल तर तुम्ही 50 व्या वर्षी करोडपती होऊ शकता. पण हे लक्षात घ्या की करोडपती होण्यासाठी, तुम्हाला आतापासून तुमच्या उत्पन्नाचा काही भाग SIP मध्ये गुंतवावा लागणार आहे. 1 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी, खालीलप्रमाणे गुंतवणूक करा.
  • तुम्हाला सामान्य एसआयपीपेक्षा टॉप-अप एसआयपीची निवड करून येथे गुंतवलेल्या रकमेचा काही भाग दरवर्षी वाढवला जातो.
  • 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी, तुम्हाला सुरुवातीला पहिल्या वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. दरवर्षी १० टक्के रक्कम वाढवावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. 1 वर्षानंतर, तुम्हाला पुढील वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 1100 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर एक वर्षानंतर, तुम्हाला एका वर्षासाठी दरमहा 1210 रुपये गुंतवावे लागणार आहेत. अशा प्रकारे दरवर्षी १० टक्के रक्कम वाढवावी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला 30 वर्षांसाठी रक्कम गुंतवणे गरजेचे आहे.
  • तुमची 30 वर्षांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सुमारे 19.74 लाख रुपये असणार आहे. यावर 13 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरला तर 30 वर्षांतील व्याजाची रक्कम 85 लाख रुपये होईल.
  • 30 वर्षांनी तुम्ही 50 वर्षांचे झाल्यावर तुमच्याकडे 1.04 कोटी रुपयांचा निधी असणार आहे.

30 व्या वर्षी होऊ शकता करोडपती

  • समजा तुमचे वय ३० वर्षे आहे, तर तुम्हाला दर महिन्याला जास्त रक्कम गुंतवावी लागणार आहे. तुमचे वय ३० असेल आणि तुम्हाला वयाच्या ५० व्या वर्षी लक्षाधीश व्हायचे असल्यास खालीलप्रमाणे गुंतवणूक करा.
  • तुम्हाला टॉप-अप एसआयपीमध्ये दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागणार आहेत. तर पहिल्या एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5000 रुपये आणि नंतर दरवर्षी 10 टक्के वाढ करा.
  • 20 वर्षांमध्ये तुम्ही सुमारे 34.36 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर यावर वार्षिक 13 टक्के व्याज मिळाले, तर व्याजाची रक्कम सुमारे 76.53 लाख रुपये इतकी होईल.
  • हे लक्षात घ्या की मुद्दल आणि व्याजासह, तुमची एकूण रक्कम 1.10 कोटी रुपये असणार आहे.

Leave a Comment