मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एका ‘आयपीओ’ची जोरदार चर्चा होतेय.. तो म्हणजे अर्थातच एलआयसी आयपीओ.. खरं तर केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षातच ‘एलआयसी’ आयपीओ आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.. मात्र, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भांडवली बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली. त्यामुळे सरकारला ही योजना पुढे ढकलावी लागली होती.

दरम्यान, भांडवली बाजारावरील मंदी नि अस्थिरतेचे मळभ आता दूर होताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार ‘एलआयसी आयपीओ’साठी जोमाने कामाला लागले आहे. पुढील महिन्यात ‘एलआयसी आयपीओ’ बाजारात धडकेल, असे समजते.. सुधारित प्रस्तावानुसार, सरकारकडून 50,000 कोटींचे शेअर विक्री केले जाणार असल्याचे समजते..

‘एलआयसी’ आयपीओबाबत आता एक मोठी अपडेट आली आहे. ‘एलआयसी’ने सेबीकडे ‘आयपीओ’चा अद्ययावत प्रस्ताव सादर केल्याचे समजते.. सुधारित कार्यक्रमानुसार, ‘एलआयसी आयपीओ’ पुढील महिन्यात मे-2022 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. ‘एलआयसी’ने 13 फेब्रुवारी 2022 रोजी सेबीकडे ‘आयपीओ’ प्रस्ताव सादर केला होता. त्याला परवानगीही मिळाली होती. त्यानंतर एलआयसीने ‘डीआरएचपी’ (DRHP)चा सुधारित प्रस्ताव सेबीकडे सादर केला. ज्यात तिमाहीतील आर्थिक आकडेवारी सादर करण्यात आली.

11 मार्च 2022 नुसार, तिसऱ्या तिमाहीत ‘एलआयसी’ला 234.91 कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात केवळ 91 लाखांची वाढ झाली. ‘एलआयसी’चा सुधारित ‘आयपीओ’ जाहीर करण्यासाठी सरकारकडे 12 मे 2022 पर्यंत वेळ आहे. या तारखेपर्यंत आयपीओ जाहीर न झाल्यास, ‘एलआयसी’ला पुन्हा नव्याने सेबीकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. या योजनेत सरकारकडून ‘एलआयसी’मधील 7 टक्के हिस्सा विकला जाण्याची शक्यता आहे. त्यातून किमान 50000 कोटींचे भांडवल उभारले जाणार असल्याचे समजते..

‘अवकाळी’सह उन्हाळ्यातही ‘अशी’ घ्या पोल्ट्री व जनावरांची काळजी; पहा केव्हीके मोहोळ यांचा कृषी सल्ला
Jio-Airtel चे टेन्शन वाढले..! व्होडाफोन आयडीयाने आणलेत आणखी दोन दमदार प्लान; चेक करा फायदे..

Share.

Leave A Reply

Exit mobile version