Side Effects of Smart Phone Use | सावधान..! मोबाइलचा अतिवापर धोकादायकच; ‘या’ समस्या करतील हैराण

Side Effects of Smart Phone Use : आजकाल मोबाइल प्रत्येकाची गरजेची वस्तू बनली आहे. मोबाइलशिवाय कोणतेही काम करणे आता अशक्य झाले आहे. दैनंदिन कामकाज असो कार्यालयातील कामकाज असो किंवा अन्य काही गोष्टी असो या प्रत्येकासाठी मोबाइलचा वापर गरजेचा बनला आहे. आज मोबाइल लोकांसाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. मोबाइलशिवाय कोणतीही गोष्ट आता शक्य होत नाही. बरेच लोक मोबाइल फोन फक्त कामासाठी वापरतात पण असे बरेच लोक आहेत जे कामाव्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी मोबाइलचा वापर करतात. देशात असे बरेच लोक आहेत जे दररोज 10 ते 12 तास मोबाइल फोन वापरतात जे त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे. तुम्ही जर जास्त वेळ मोबाइलचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

दीर्घकाळापर्यंत मोबाईल फोन वापरण्याचे तोटे

डोळ्यांवर ताण

मोबाइल स्क्रीनकडे सतत पाहत राहिल्यास डोळ्यांवर ताण निर्माण होतो ज्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. ही गोष्ट जर टाळायची असेल तर मोबाइलचा वापर कमी करणे हाच एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

Smart Phone Function | ‘स्वीच ऑफ’ की ‘रिस्टार्ट’, कोणती आयडीया बेस्ट? जाणून घ्या, मोबाइलचं खास सिक्रेट.

Side Effects of Smart Phone Use

आरोग्याच्या समस्या

मोबाइल फोनचा जास्त वेळ वापर केल्याने मान आणि पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता असते. असे अनेक लोक आहेत ज्यांना मोबाइलच्या अतिवापरामुळे मानदुखी, पाठदुखी तसेच डोकेदुखी होण्याची समस्या निर्माण झाली आहे. या शारीरिक समस्या भविष्यात आणखी वाढू शकतात. परंतु जर या गोष्टी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही आतापासूनच मोबाइलचा वापर नियंत्रित करण्यावर भर द्या. ज्यावेळी आवश्यक असेल तेव्हाच आणि महत्त्वाच्या वेळी मोबाईलचा वापर करा. अन्य वेळी मोबाईल जितका टाळता येईल तितका टाळण्याचा प्रयत्न करा.

झोपेच्या समस्या

अनेक लोकांना रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहण्याची सवय असते. रात्री जास्त वेळ मोबाइलचा वापर केल्याने झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. कारण मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम करू शकतो. तसेच झोपेच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी मोबाइलचा वापर कमी करणे हाच एक उत्तम पर्याय आहे.

Side Effects of Smart Phone Use

Smartphone Tips : सावधान! अशा ठिकाणी चुकूनही चार्ज करू नका फोन, सरकारनेच दिला सतर्कतेचा इशारा

मानसिक आरोग्याच्या समस्या

मोबाइलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो जसे की अतितणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय काहीवेळा असेही होऊ शकते की तुम्ही फोन रिसीव न केल्यास तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटू शकते. या गोष्टी टाळायच्या असतील तर मोबाइलचा वापर कमी प्रमाणात करणेच फायदेशीर ठरू शकेल. मोबाइलच्या जास्त आहारी जाण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी महत्त्वाचे असेल आणि आवश्यक असेल त्यावेळी मोबाइलचा वापर जरूर करा परंतु ज्यावेळी खरंच मोबाइलची गरज नसेल त्यावेळी मोबाइल टाळण्याचा प्रयत्न करून पहा.

शक्यतो जेवण करत असताना टीव्ही पाहताना किंवा कुणाशी बोलत असताना मोबाइल फोनचा वापर न करणे चांगले. अगदी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइल फोनचा वापर करा. मोबाइलच्या अतिवापरामुळे सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंधही खराब होऊ शकतात. या गोष्टी टाळणेही तुमच्याच हातात आहे.

Leave a Comment