Side Effects of Sitting more Time : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना एकाच ठिकाणी जास्त वेळ (Side Effects of Sitting more Time) बसण्याची सवय झाली आहे. ऑफिस असो की घर सगळीकडे खुर्चीवर बसण्याची सवय वाढली आहे. जर तुम्हालाही अशीच सव असेल तर ताबडतोब बदला कारण एका अभ्यासातून असे समोर आले आहे की जर कुणी दिवसातून 10 तास बसले तर डिमेंशिया होण्याचा धोका जास्त असतो. स्मृतिभ्रंश हा वृद्धांमध्ये आढळणारा एक आजार आहे ज्यामध्ये लोक बहुतेक गोष्टी विसरतात. या आजारामुळे लोकांना त्यांच्या नातेवाईकांनाही ओळखता येत नाही. परंतु जर लोक दिवसातून 10 तासांपेक्षा जास्त वेळ बसले तर त्यांना लहान वयातही स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
50 हजार लोकांवर अभ्यास केला
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया आणि अॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या अकादमीने त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या लोकांची बैठी जीवनशैली असते त्यांना स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका जास्त असतो. अभ्यासादरम्यान संशोधकांनी 60 वर्षांवरील 50 हजार लोकांचा आरोग्य डेटा गोळा केला आणि त्याचा अभ्यास केला. या लोकांच्या हातात अॅक्टिव्हिटी ट्रॅकर घालण्यात आले होते जेणेकरुन ते दिवसभर किती सक्रिय असतात हे कळू शकेल. यामध्ये संगणक वापरणे, व्हिडिओ गेम खेळणे, वाहन चालवणे, टीव्ही पाहणे आणि बसून कोणतेही काम करणे ही बैठी जीवनशैली मानली गेली. यापैकी पुढील 6 वर्षांमध्ये 400 हून अधिक लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसून आली.
10 तासांपेक्षा जास्त वेळ बसणे म्हणजे धोकाच
अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला की जे लोक दिवसातून 10 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका 8 टक्के जास्त असतो. जे लोक 12 तास न फिरता बैठी जीवनशैली जगत होते त्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका जास्त होता. अशा लोकांमध्ये डिमेंशिया म्हणजेच स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांपर्यंत होते. त्याच वेळी 15 तास बसून राहणाऱ्यांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका तिप्पट होता.
प्रमुख संशोधक प्रोफेसर जीन अलेक्झांडर यांनी सांगितले की, अभ्यासाच्या निष्कर्षाने मला आश्चर्य वाटले की जर एखादी व्यक्ती 10 तासांपेक्षा जास्त काळ बसून राहिली म्हणजे हालचाल न करता बसून राहिली तर डिमेंशियाचा धोका वाढतो. अलेक्झांडर म्हणाले की हा अभ्यास एक इशारा आहे की जे लोक आपला बहुतेक वेळ निष्क्रिय बसतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. म्हणून जास्त वेळ एकाच जागी बसून राहून नका. ऑफिसमध्ये बसूनच काम असेल तरी मधून मधून ब्रेक घेऊन थोडेस फिरत राहा.