दिल्ली : सुप्रसिद्ध युट्युब स्टार (YouTube Star) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून जगभरात नाव कमावलेल्या श्याम रंगीला (shyam rangeela) याने अखेर आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi CM aravind Kejariwal) यांची भेट घेऊन त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) अर्थात आप या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आप या पक्षाला राजस्थान (Rajasthan politics) राज्यात कितपत फायदा होतो याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
याबद्दल आपने ट्विटरवर माहिती देताना म्हटले आहे की, राजस्थानचे प्रसिद्ध विनोदी कलाकार श्याम रंगीला हे AAP मध्ये सामील झालेले आहेत. श्याम रंगीला हे आपल्या व्यंग कलेने लोकांच्या दुःखी चेहऱ्यावर हसू आणत आहेत. आता कलेसोबतच देशात ‘कामाचे राजकारण’ करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या साथीने ते शिक्षण आणि आरोग्य क्रांतीचा प्रकाश जागवणार आहेत. त्यावर रंगीला यांनी “अरे देवा… मी विचारेन हे कसे झाले” असे ट्विट केले आहे.
“ओह माई गॉड…मैं पूछुंगा ऐसा कैसे हुआ” https://t.co/oYW9Wj8wjJ
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 5, 2022