मुंबई – भारताचा (India) माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबाबत (Shoaib Akhtar) खळबळजनक विधान केले आहे. वीरेंद्र सेहवागने असे विधान केले आहे, जे शोएब अख्तरला सहन होणार नाही. शोएब अख्तरला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते.
शोएब अख्तरने क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला आहे. शोएब अख्तरने 2003 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ‘चकिंग’ करायचा, असे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे मत आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने होम ऑफ हीरोज स्पोर्ट्स 18 च्या नवीन एपिसोडमध्ये संजय मांजरेकर यांची मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘शोएब अख्तरला माहित होते की त्याची कोपर वाकते आणि तो डिस्कस बॉल फेकतो. अन्यथा आयसीसीने त्याच्यावर बंदी का घातली असती.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘शोएब अख्तरची कोपर वाकलेली असायची आणि त्याचा हात कुठून येतो आणि चेंडू कुठून येतो हे फलंदाजाला कळत नव्हते. जर आपण ब्रेट लीबद्दल बोललो, तर त्याचा हात सरळ यायचा, ज्यामुळे फलंदाजाला चेंडू उचलणे थोडे सोपे होते.
शोएब अख्तर रेकॉर्ड
शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी 46 कसोटी सामन्यात 25.7 च्या सरासरीने 178 विकेट घेतल्या आहेत. शोएब अख्तरने 163 एकदिवसीय सामन्यांमध्ये 24.98 च्या सरासरीने 247 विकेट घेतल्या आहेत. शोएब अख्तरने 15 टी-20 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत.