Bengaluru Airport : बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे.
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने विमानतळावर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली आहे. पोलीसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून रमेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर रामकृष्ण असे मृत व्यक्तीचा नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बसने विमानतळावर पोहोचला आणि रामकृष्णाशी भांडण सुरू केले. त्याने सोबत एक मोठा चाकूही आणला होता आणि त्याद्वारे त्याने रामकृष्ण याचा गळा चिरला.
भांडणानंतर वार करून खून
रामकृष्ण विमानतळावर ट्रॉली ओढण्याचे काम करायचा. रमेश बीएमटीसीच्या बसमध्ये विमानतळावर पोहोचला आणि रामकृष्णाशी भांडण केले त्यानंतर त्याने चाकू काढून रामकृष्णा वर हल्ला केला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने रामकृष्णाचा मृत्यू झाला. ईशान्य बेंगळुरू पोलीस विभागाच्या विमानतळ पोलिसांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळालावरून आरोपीला अटक केली.
पत्नीशी अवैध संबंध असल्याचा संशय
रामकृष्णचे त्याच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा रमेशला संशय होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रामकृष्ण विमानतळावर काम करत असल्याचे रमेशला कळते. रागाच्या भरात त्याने विमानतळ गाठून रामकृष्ण यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने त्याचा गळा चिरला.
बेंगळुरू शहराच्या ईशान्य विभागाचे पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, हत्येचा आरोपी रमेश याने कॉलेजच्या बॅगमध्ये चाकू ठेवला होता आणि बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बसने विमानतळावर आला होता.
तो बसमधून प्रवास करत असल्याने बॅग स्कॅन झाली नव्हती. टर्मिनल 1 (लेन 1) च्या अरायव्हल्स पार्किंग एरियामधील टॉयलेटजवळ ही घटना घडल्याचे डीसीपीने सांगितले.