दिल्ली – जर तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration card) असेल आणि तुम्ही दर महिन्याला सरकारकडून मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
गव्हाऐवजी तांदूळ देण्याची तयारी
केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. हे वितरण पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल.
तीन राज्यांत गहू मिळणार नाही
मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. या बदलानंतर यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही. त्याचवेळी दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
गव्हाच्या कमी खरेदीचे कारण
यूपी-बिहारमधील गव्हाचे वाटप संपुष्टात येण्याचे कारण गव्हाची कमी खरेदी असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात येणार असल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. हा बदल फक्त PMGKAY साठी आहे. याचा परिणाम असा होईल की काही राज्यांमध्ये गहू कमी होऊन पूर्वीपेक्षा जास्त तांदूळ दिला जाईल.