Rohit Sharma: येत्या काही दिवसांत आयपीएल 2025 साठी लिलाव होणार आहे. या लिलावासाठी बीसीसीआयकडून तयारी देखील सुरू झाली आहे.
त्यामुळे या लिलावात प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना सोडणार किंवा कोणाला कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहीत शर्मा आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला राम राम ठोकून दुसऱ्या संघापासून खेळताना दिसू शकते. मात्र, रोहित शर्माने आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. असे दावे मीडिया रिपोर्ट्समध्ये केले जात आहेत.
रोहित शर्मा कोणत्या संघाकडून खेळणार?
2025 च्या आयपीएल लिलावापूर्वी रोहित शर्मा खरोखरच मुंबई इंडियन्समधून आपले नाव काढून घेईल का? या प्रश्नाचा उत्तर सध्या कोणाकडे नाही मात्र अशी चर्चा सुरू आहे की रोहीत शर्मा 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी होऊ शकतो.
जर तो सीएसकेमध्ये सामील झाला तर तो कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार का? सध्या सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाड आहे. महेंद्रसिंग धोनीनेही अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माला कर्णधार बनवणे सीएसकेला कठीण जाईल, परंतु त्याच्या समावेशाचा विचार केला जाऊ शकतो. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल. आयपीएल 2025 चा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे. आयपीएल लिलावात खेळाडूंवर बोली लावली जाईल.
आयपीएलच्या 17 व्या सत्रापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे, त्याचे कारण म्हणजे त्याला अचानक कर्णधारपदावरून काढून टाकणे आणि हार्दिक पांड्याकडे कमान सोपवणे असे मानले जाते. यानंतर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. मैदानावरील हार्दिक पांड्याचे वागणेही रोहित शर्माला योग्य वाटले नाही. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून इतर कोणत्याही फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो.