Shiv Sena UBT Candidate List : श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण? 21 मतदारसंघातील शिलेदारही ठरले

Shiv Sena UBT Candidate List : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू (Shiv Sena UBT Candidate List) झाली आहे. आज महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आणखी चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जळगाव, कल्याण, हातकणंगले आणि पालघर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. जळगाव मतदारसंघातून करण पवार, कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघर मतदार संघातून भारती कामडी आणि हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या आधीच्या यादीत 17 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांना महायुतीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेत ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा होती परंतु ठाकरे गटाने केलेली विनंती त्यांनी अमान्य केली. त्यामुळे ठाकरे गटाने येथून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पालघर मतदारसंघातून भारतीय कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Ahmednagar Lok Sabha : लंकेंविरोधात विखे-शिंदे एकत्र; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास मेसेज

Shiv Sena UBT Candidate List

आतापर्यंत ठाकरे गटाने एकूण 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख, मावळ मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, हिंगोली मतदारसंघातून नागेश पाटील अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत, ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे, मुंबई ईशान्य मतदारसंघातून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्य मतदारसंघातून अमोल कीर्तिकर, परभणी मतदारसंघातून संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील, जळगाव मतदारसंघातून करण पवार आणि पालघर मतदार संघातून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Shiv Sena UBT Candidate List

Osmanabad Lok Sabha : ठाकरेंच्या शिलेदाराला कोण टक्कर देणार? महायुतीचं अजून काही ठरेना..

Leave a Comment