Shiv Sena MP : महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, शिवसेना खासदारांची धाकधूक वाढली, 13 खासदारांपैकी कोणाचा पत्ता होणार कट ?

Shiv Sena MP : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत मात्र तरी देखील राज्यातील सत्ताधारी महायुतीत जागावाटपाचा तिढा कायमच आहे.

अनेक बैठकांनंतर देखील अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यातच महायुतीमध्ये मनसेची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.

हे जाणून घ्या कि, काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मात्र तरीही देखील हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

अनेकांना लागणार धक्का! राज ठाकरे करणार मोठी घोषणा, भाजपला होणार फायदा?

तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खासदारांनी भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही भेट घेण्यात आल्याची चर्चा आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांसोबत चर्चा करून प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली.

याच वेळी शिंदे यांनी खासदारांना वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा अशीही सूचना दिली असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी खासदारांना या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे यामुळे तुम्ही त्यागासाठी तयार रहा, उमेदवार कोणताही असला तरीही महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी शिवसेना खासदारांना दिला.

काही दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांची तिकीट कापू नका आणि विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा अशी मागणी केली होती मात्र आता शिंदे यांनी खासदारांना त्यागासाठी तयार राहा असं सांगितल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

या भेटी दरम्यान शिंदे म्हणाले लोकसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीत काहीच वाद नाही. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात तिन्ही पक्षाचा सन्मान राखला जाईल, लोकसभा निवडणुकीत राज्यातून 45 जागा कशा निवडून येतील याचा सर्वांनी विचार करावा असं शिंदे यांनी सांगतिले.

Gold Loan घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्याच नाहीतर होणार नुकसान

तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या 4-5 विद्यमान खासदारांची तिकीट कापली जाणार आहे.

Leave a Comment