Shirdi Loksabha Election | शिवसेना खासदार लोखंडे अडचणीत; मोदी-शिंदे-फडणवीस यांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष

Shirdi Loksabha Election | स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी आज पुणे येथील पत्रकार भवनात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणाची दखल घेऊन त्यांचा राजकीय पक्ष शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर कोणती कारवाई करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच इतर पक्षातील प्रकरणांवर रान उठवून संबंधितांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उमेदवारी कापतात की शाबीत ठेऊन पाठराखण करणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना एक आणि आमदार-खासदार पदावर असलेल्या प्रस्थापित व धनदांडग्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेगळा न्याय अशा प्रकारचा उलटा कारभार ‘नाबार्ड’द्वारे केला जात असल्याचे दिसते. लोखंडे यांच्या अधिपत्याखालील खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई येथील असून या संस्थेचे संचालकपदी त्यांच्या एकाच कुटुंबातील पाचजण संचालक आहेत. असे असतानाही नियमांना बगल देवून या कंपनीला केंद्र शासनाचे ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज दिले गेले असून, यापैकी १६ कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे. ही एकूण प्रक्रिया बेकायदेशीर आहे असा आरोप करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खासदार लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार असल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी आज पुणे येथील पत्रकार भवनात सांगितले आहे. त्यामुळे आता मोदी याकडे कसे पाहतात आणि शेतकऱ्यांचा मलिदा खाणाऱ्या आपल्याच घटक पक्षातील उमेदवारास पुन्हा संधी देतात की तिकीट कापतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Signed Press Note खासदार लोखंडे कडून पदाचा गैरवापर

Leave a Comment