Shirdi Lok Sabha | शिर्डी सोपी नाहीच! आणखी एका उमेदवाराची एन्ट्री; कुणाची होणार कोंडी?

Shirdi Lok Sabha Constituency Update : शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट (Shirdi Lok Sabha Constituency Update) आला आहे. वंचित बहुजन आघाडीने दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत रघुनाथ कदम यांना तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रूपवतेंना उमेदवारी (Utkarsha Rupwate) जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रूपवते यांनी एक दिवस आधीच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिक अटीतटीची होणार आहे.

शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे गटाने पुन्हा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट दिले आहे. याआधी उत्कर्षा रूपवते या महाविकास आघाडीकडून इच्छुक होत्या. त्यांनी तिकिटासाठी मागणी देखील केली होती. परंतु जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. यानंतर ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उत्कर्षा रूपवते नाराज होत्या. यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आता वंचित बहुजन आघाडीने त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रुपवतेंना तिकीटही दिले आहे.

Shirdi Lok Sabha | शिर्डीत काँग्रेसचं गणित बिघडणार? मोठ्या नेत्याची वंचित आघाडीत एन्ट्री; ठाकरेंचीही कोंडी

Shirdi Lok Sabha

उत्कर्षा रुपवतेंच्या उमेदवारीने शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. रुपवते अकोले तालुक्यातील रहिवासी आहेत तर ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील अकोले तालुक्यातील आहेत. त्यामुळे या तालुक्यात मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका ठाकरे गटाच्या उमेदवाराला बसू शकतो. तसेच वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा मतदार या मतदारसंघातील नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे याचा फायदा रुपवते यांना होऊ शकतो.

दरम्यान, शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना तर शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते परंतु तरीही त्यांची उमेदवारी बदलली गेली नाही तर दुसरीकडे ठाकरे गटाने ही नुकतेच पक्षात आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली.

Shirdi Lok Sabha

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

Leave a Comment