Shirdi Lok Sabha | शिर्डीत काँग्रेसचं गणित बिघडणार? मोठ्या नेत्याची वंचित आघाडीत एन्ट्री; ठाकरेंचीही कोंडी

Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर (Shirdi Lok Sabha Election) आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रुपवतेंनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. आता जर वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी दिली तर ठाकरे गटाची अडचण मात्र वाढणार आहे.

या मतदारसंघात महाविकासाकडून उत्कर्षा रूपवते निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. त्यांनी तिकिटाची मागणी देखील केली होती. परंतु जागावाटपात हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना मैदानात उतरवले. त्यामुळे उत्कर्षा रूपवते कमालीच्या नाराज झाल्या होत्या. या नाराजीतूनच त्यांनी काल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज आणखी एक पाऊल पुढे टाकत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

Thane Lok Sabha | शिंदेसेनेसाठी गुडन्यूज! कल्याणपाठोपाठ ‘हा’ मतदारसंघही मिळणार; पहा, कसं फिरलं राजकारण?

Shirdi Lok Sabha

वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघात अजून उमेदवार दिलेला नाही त्यामुळे जर आघाडीने रूपवतेंना तिकीट दिले तर मतदारसंघातील निवडणूक आणखी अटीतटीची होणार आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना तर शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते परंतु तरीही त्यांची उमेदवारी बदलली गेली नाही तर दुसरीकडे ठाकरे गटाने ही नुकतेच पक्षात आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली.

Shirdi Loksabha Election | पदाचा गैरवापर करणाऱ्या लोखंडेंची उमेदवारी धोक्यात; त्या’ प्रकरणी शेतकरी संघटना करणार आंदोलन

Leave a Comment