Shirdi Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकांची घोषणा (Lok Sabha Election) झाली आहे. राजकीय पक्षांकडून (Shirdi Lok Sabha Constituency) या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. नगर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे जोरात (Ahmednagar News) वाहत आहेत. या जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत. त्यातील नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही.
तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही उमेदवारांची निवड करण्यात गोंधळल्याचे दिसत आहे. नगर दक्षिणेच्या तुलनेत येथे इच्छुकांची संख्या जास्त आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मतदारसंघावर (MNS) दावा ठोकला आहे. महायुतीत मतदारसंघ कुणाला जाईल याचे उत्तर अजून मिळालेले नाही.
Lok Sabha Election 2024 : आता भाजपविरोधात लढणार! ‘या’ कारणांमुळे BJP-BJD युती होण्याआधीच ब्रेक
Shirdi Lok Sabha
दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) नगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी शिर्डी मतदारसंघात आमचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. त्यामुळे ही जागा आम्हीच लढणार असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाने या मतदारसंघावर दावेदारी पक्की केल्याचा अर्थ काढला जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्याबद्दल काहीशी नाराजी दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते. लोखंडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी केली होती. या सगळ्या घडामोडीत मनसेनेही या मतदारसंघावर दावेदारी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीत मनसेने नाशिक, दक्षिण मुंबईबरोबरच शिर्डीचीही मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जाईल आणि कुणाला तिकीट मिळेल या प्रश्नांचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.
Shirdi Lok Sabha
मध्यंतरी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्काही बसला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. आता जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाच्या वाट्याला गेला तर उमेदवारीसाठी कांबळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
एकूणच शिर्डी मतदारसंघाचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. या अनिश्चित परिस्थितीमुळे इच्छुकांची धाकधूक मात्र नक्कीच वाढली आहे.