Shell Companies : नोंदणी (Registration) होऊन ६ महिने उलटूनही व्यवसाय (Business) सुरू न करणाऱ्या ४० हजार कंपन्यांची नोंदणी रद्द (Canceled company registration) करण्यात आली आहे. त्यापैकी ७५०० कंपन्या या दिल्ली (Delhi) आणि हरियाणामध्ये (Hariyana) नोंदणीकृत (Registered) आहेत. याशिवाय ८ लाख कंपन्यांनी व्यवसाय बंद केला, अलीकडेच याची चौकशी ‘कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने’ (Ministry of Corporate Affairs) केली आहे.
- Rate Hike : “या” देशानी केली तीन दशकातील सर्वात मोठी व्याजदर वाढ
- IPO Breaking : या दोन कंपन्यांची आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एंट्री
- Paint stock Prices : म्हणून “या” शेअर्सची किंमत १३ टक्क्यांनी वाढली
- SEBI News : म्हणून ८२ कंपन्यांना २२.६४ कोटींचा दंड : ४५ दिवसांत दंड भरायची सेबीची सक्ती
या सर्व शेल कंपन्या (Shell Companies) होत्या तसेच निष्क्रिय कंपन्यांच्या (Inactive companies) माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २०१६ मध्ये जेव्हा नोटाबंदी (Demonetization) झाली, तेव्हा अशा कंपन्यांची ओळख पटली ज्यांनी नोंदणीच्या २ वर्षानंतरही व्यवसाय सुरू केला नव्हता. ज्या कंपन्यांनी नोंदणी केल्यानंतर सहा महिन्यांत व्यवसाय सुरू केला नाही अशा सर्व कंपन्यांवर कारवाई (action) करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीची नोंदणी रद्द केल्याने कंपनीचे दायित्व (Liability of the company) काढून टाकले जाणार नाही. अधिकार्यांनी सांगितले की, नावे काढून टाकल्याने संचालक (Director) किंवा कंपन्यांवरील दायित्व देखील हटणार नाहीये. कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना (Agencies) कंपनीच्या नावावर संशयास्पद व्यवहार (Suspicious Transactions) आढळल्यास कंपनी आणि तिचे संचालक कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार असतील, असे अहवालात म्हटले आहे.
देशात २३ लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ १४ लाख सक्रिय (Active) आहेत. कंपनीची नोंदणी रद्द झाल्यानंतर त्याची यादी मंत्रालयाच्या वेबसाइटवर टाकली जाते.
जगातील ८५ देशांमध्ये उत्पादन खर्चाच्या बाबतीत भारत ३१ व्या क्रमांकावर आहे. ओपन फॉर बिझनेस (Open for Business) प्रकारात भारत (India) ३७ व्या क्रमांकावर आहे. हा अहवाल ७३ वैशिष्ट्यांमधील ८५ देशांचे मूल्यांकन (Assessment) करतो.