नाशिक : शेअर बाजारातून पैसे कमाईची चांगली संधी शोधत असाल ही बातमी महत्वाची आहे. कारण, अशी संधी तुम्हाला सरकारी बँकांच्या स्टॉकमध्ये मिळू शकते. बाजारात सध्या बँकेच्या शेअर्सना मोठी मागणी आहे. त्याचवेळी Emkay Global Financial Services यांनी संशोधन अहवालात 4 बँकांची लक्ष्य किंमत प्रसिद्ध केली आहे. एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते, जर सध्या एखाद्याने या बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर ही लक्ष्य किंमत 1 वर्षाच्या आत गाठली जेल.
अर्थात आपण अभ्यास करूनच असे शेअर घ्यावेत. कारण अशी माहिती पेरून अनेकदा गुंतवणूकदारांची फसवणूक सुद्धा झालेली आहे. गुंतवणुकीसाठी चांगले बँक शेअर्स बघायचे असतील तर आपण या 4 बँकांच्या शेअर्सचा विचार करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी उत्कृष्ट आर्थिक निकाल जाहीर केल्यावर ब्रोकरेजने एसबीआयच्या स्टॉकची टार्गेट किंमत वाढवली आहे. एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसने 7 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या संशोधन अहवालात SBI ची लक्ष्य किंमत 715 रुपये नमूद केली असून एसबीआयचा शेअर सोमवारी NSE वर 613.80 रुपयांवर बंद झाला.
सर्व्हिसेसने बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकवर 7 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात बँक ऑफ बडोदाची लक्ष्य किंमत 175 रुपये ठेवली आहे. दुसरीकडे बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सोमवारी NSE वर 158.25 रुपयांवर बंद झाले. तर, संशोधन अहवालात इंडियन बँकेची लक्ष्य किंमत 310 रुपये देण्यात आली आहे. दुसरीकडे, इंडियन बँकेचे शेअर्स सोमवारी NSE वर 259.00 रुपयांवर बंद झाले होते. अहवालात सिटी युनियन बँकेची लक्ष्य किंमत 228 रुपये असून सिटी युनियन बँकेचे शेअर्स सोमवारी NSE वर 196.20 रुपयांवर बंद झाले.
म्हणून होतोय बँक संप; पहा किती दिवस सेवा बाधित होणार, आणि कशासाठी..
RBI चा झटका ग्राहकांनाही..! पहा कसा परिणाम होणार बंद केलेल्या बँकांच्या ग्राहकांवर