Share Market Updates : भारतीय बेंचमार्क निर्देशांकांच्या (Indian Benchmark Indices) आणखी एका अस्थिर सत्रात किरकोळ वाढ झाली आणि २१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात मार्केटमध्ये आर्थिक व्यवहारात सकारात्मकता दिसून आली.
शेअर बाजार बंद झाला तेव्हा, सेन्सेक्स (Sensex) १०४.२५ अंकांनी (०.१८%) वाढून ५९३०७.१५ वर होता तर निफ्टी (Nifty) १२.३० अंकांनी (०.०७%) १७५७६.३० वर होता. संवत २०७८ (Samvat 2078) मध्ये, बीएसई (BSE) सेन्सेक्स (Sensex) १ टक्क्यांहून अधिक घसरला, तर निफ्टी५० (Nifty 50) जवळपास २ टक्क्यांनी घसरला.
- Share Market News : निफ्टी १७१अंकांनी तर सेन्सेक्स ६८४ अंकांनी वाढला
- Opening Bell : सलग सहाव्या दिवशी मार्केटमध्ये हिरवा कंदील
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Wipro Share Return: लाखाचे झाले 1.8 कोटी..! फक्त 20 वर्षांत इन्व्हेस्टर झालेत गब्बर
जागतिक संकेतांमध्ये (Global Signals) देशांतर्गत बाजाराची (domestic market) सुरुवात कमकुवत तसेच नकारात्मकतेने (Negative) झाली आणि सत्राचा बहुतांश भाग नकारात्मक क्षेत्रात राहिला. तथापि, शेवटच्या तासांच्या खरेदीमुळे निर्देशांक (Index) दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद झाले.
“कठोर चलनविषयक धोरणाच्या भीतीमुळे युरोपीय बाजारपेठेत दुस-या सहामाहीत विक्रीची सुरुवात झाली. स्थानिक गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्यामुळे कमी आठवड्याच्या अपेक्षेने नफा बुक (Book profit) करण्यास सुरुवात केली,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) संशोधन प्रमुख (Head of Research) विनोद नायर (Vinod Nair) यांनी सांगितले.
“बँका(Banks), आयटी (IT), आणि एफएमसीजी (FMCG) समभागांनी बाजारात स्थिरता राखली परंतु मिड (Mid) आणि स्मॉल कॅप्सवर (Small cap) मोठा परिणाम झाला. ऑक्टोबरमध्ये पतवाढ १० वर्षांच्या उच्चांकी १७.९४ % वर पोहोचल्याने आर्थिक समभागांमध्ये रंग भरला, असे नायर पुढे म्हणाले.
आजच्या निफ्टीच्या वाढलेल्या शेअरमध्ये अॅक्सिस बँक (Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak mahindra bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचयूएल (HUL) आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स (SBI life insurance) हे होते. निफ्टीच्या पडलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स (Bajaj Finance), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Fin serve), डिव्हिस लॅब्स (Divis lab), अदानी पोर्ट्स (Adani ports) आणि यूपीएल (UPL) यांचा समावेश आहे.
बीएसईवर (BSE), बँक (Bank) वगळता (२ टक्के वर), इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral indices) भांडवली वस्तू (Capital goods), आरोग्य सेवा (Health care), उर्जा (Energy) आणि धातू निर्देशांक (Metal indices) ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर साऊथ इंडियन बँक (South Indian Bank), पेज इंडस्ट्रीज (Page Industries), सन फार्मा (Sun Pharma), कर्नाटक बँक (Karnataka Bank), कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन (Kalpataru Power Transmission), आयटीसी (ITC), अॅक्सिस बँक (Axis Bank) यांनी 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला.
क्षेत्रीय आघाडीवर (Sectoral Front) , निफ्टी बँक निर्देशांक (Nifty Bank Index) १.७ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक (PSU Bank Index) १.८५ टक्क्यांनी वधारला. ऊर्जा (Energy), फार्मा (Pharma), इन्फ्रा (Infra), धातू (Metal) आणि माहिती तंत्रज्ञान (Information technology) समभागांमध्ये मात्र विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप (BSE mid cap) आणि स्मॉलकॅप निर्देशांक (Smallcap Index) प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले.