Share Market New : निफ्टी (Nifty) १७१अंकांनी (१७२०० ला बंद झाला) तर सेन्सेक्स (Sensex) ६८४ पॉईंट्सने वाढला. आज मार्केटमध्ये आयटी (IT), वित्तीय बँक (Financial Bank), कॅपिटल गुड्स (Capital Goods), हेल्थकेअर आणि आयटी निर्देशांक (Healthcare and IT Indices) ०.५ -१.८ टक्क्यांनी वाढले, तर मेटल (Metal), पॉवर (Power), ऑटो (Auto), रियल्टी आणि तेल आणि गॅस निर्देशांक (Realty, Oil and Gas Indices) ०.५-१ टक्क्यांनी घसरले.
- Maharashtra Politics : “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके”, असे गात सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
- Wipro Share Return: लाखाचे झाले 1.8 कोटी..! फक्त 20 वर्षांत इन्व्हेस्टर झालेत गब्बर
- Business News : ही कंपनी २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
आजच्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) सुमारे १७५७ शेअर्सच्या किमती वाधरली असून १५९१ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १४६ शेअर्सच्या किमतींमध्ये कुठलाही बदल झाला नाहीये. इन्फोसिस (Infosys), एचडीएफसी बँक (HDFC Bank). एचडीएफसी (HDFC), यूपीएल (UPL) आणि एचसीएल टेक (HCLTech) या निफ्टी वाढवणाऱ्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या आहे तर ओएनजीसी (ONGC), एमअँडएम (M&M), बजाज ऑटो (Bajaj Auto), जेएसडब्ल्यू स्टील(JSW Steel) आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industry) या आजच्या सर्वाधिक घसरलेल्या कंपन्या आहेत. बँक (Bank), कॅपिटल गुड्स (Capital Goods), हेल्थकेअर (Healthcare), आयटी क्षेत्रांमध्ये (IT Field) ०.५-१.८ टक्क्यांनी वाढ झाली, तर धातू (Metal), ऊर्जा आणि रिअॅल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.५-१ टक्क्यांनी घसरले.
बीएसई मिडकॅप (BSE Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap index) निर्देशांक फ्लॅट नोटवर (ना वाढले आणि कमी झाले) संपले.
भारतीय रुपया (Indian rupee) पूर्वीच्या ८२.३५ च्या तुलनेत किरकोळ घसरत ८२.४० प्रति डॉलरवर (Doller) बंद झाला.