मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने मजबूती दाखवली आहे. सोमवारी सेन्सेक्स अस्थिरतेनंतर ६११८५.१५ अंकांच्या पातळीवर बंद होऊन त्यात २३४.७९ अंकांची वाढ दिसून आली. दुसरीकडे, ब्रॉडर बेंचमार्क निफ्टीही ८५.६५ अंकांच्या वाढीसह १८१९९.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. आजच्या सत्रात सुमारे १९९४ शेअर्स वाढले, १४६५ शेअर्समध्ये घट झाली आणि १८५ शेअर्स अपरिवर्तित झाले.
सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात ब्रिटानिया, एसबीआय, रेल विकास निगम लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली. यातील ब्रिटानिया, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआय या पीएसयू बँकेचे त्रैमासिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले जाहीर झाल्यामुळे आज या शेअर्समध्ये वाढ बघायला मिळाली. रेल विकास निगम लिमिटेड या शेअरने नुकताच ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला असून याचे आर्थिक वर्षातील त्रैमासिक निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
- PSU Bank : “या” बँकेचा नफा 59% वाढून 3,313 कोटी झाला
- Foodtech Sectors: “यांनी” सांभाळली ‘झोमॅटो’ कंपनीची कमान : गेल्या वर्षभरात ५२ टक्क्यांनी पडला शेअर
- Sberbank sues Glencore : म्हणून रशियन बँकेने उचलले हे पाऊल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- PSU Banks : सार्वजनिक क्षेत्रातील “या” बँकेचा नफा १३,३६४ कोटी रुपयांवर पोहचला : ही आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक
‘एनएससी’वरील व्हॉल्यूम अलीकडील सरासरीपेक्षा जास्त होते. सेक्टरमध्ये धातू, ऑटो, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी सर्वाधिक वाढले तर हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ब्रॉड मार्केट इंडेक्सने निफ्टीला ०.६४-०.६९ टक्क्यांनी मागे टाकले तरीही आगाऊ घट गुणोत्तर १.५०:१ पर्यंत वाढले.
निफ्टीने इंट्रा डे नीचांकीवरून चांगले सावरले आणि पुन्हा सकारात्मक पातळीवर बंद झाले. मंगळवारच्या ब्रेकनंतर आता १८२८७-१८३२२ बँडच्या प्रतिकाराला सामोरे जावे लागू शकते तर १८०९० नजीकच्या काळात समर्थन देऊ शकतात असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले आहे.