मुंबई : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) संकट अधिक गडद झाल्यामुळे आज जगभरातील (World) शेअर (Share) बाजार कोसळले. त्याचा परिणाम (Efecct) देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यापारात बीएसई सेन्सेक्स 1000 अंकांपेक्षा अधिक घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी जवळपास 300 अंकांनी घसरला. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 1141.16 अंकांनी म्हणजेच 1.98 टक्क्यांनी घसरून 56,542.43 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीही 336.90 अंकांनी किंवा 1.96% घसरून 16,869.75 वर पोहोचला.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व समभागांमध्ये घसरण झाली आहे. डॉ रेड्डीज, एशियन पेंट्स, टीसीएस, एल अँड टी, इंडसइंड बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह प्रत्येकी 2-3 टक्क्यांनी घसरले. निफ्टीमध्ये फक्त ओएनजीसीचे शेअर्स वधारले. रशिया आणि युक्रेनमधील संकट गहिरे झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ओएनजीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
- Share Market Info : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी महत्वाचे आहेत हे १० गुण; वाचा महत्वाची माहिती
- आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
- Share Market Latest Update : आणि म्हणून सेन्सेक्सने पार केला 55 हजारांचा टप्पाही..!
ब्रॉडर मार्केट्स देखील उतरणीसह व्यवहार करत आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक दोन टक्क्यांपर्यंत घसरले. NSE वर सुमारे 2400 समभाग घसरत आहेत तर केवळ 155 समभाग सकारात्मक क्षेत्रात दिसत आहेत. भारत VIX निर्देशांक देखील 19 टक्क्यांनी वाढून 27 च्या वर पोहोचला आहे.
दरम्यान, गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक. यानुसार, युक्रेनमधील संकट अधिक गहिरे झाल्यास आणि रशियावर निर्बंध लादले गेल्यास अमेरिकेच्या शेअर्समध्ये 6 टक्के घसरण होऊ शकते. गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांनी सोमवारी एका नोटमध्ये हे सांगितले. जर रशियन चलनाचे अवमूल्यन 10 टक्क्यांनी झाले तर कच्च्या तेलाच्या किमतीत 13 टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि बेंचमार्क ट्रेझरी उत्पन्नात 27 बेसिस पॉइंटची घसरण होऊ शकते.