मुंबई: ‘सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागतली होती, ते ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते’, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रसह देशभरातील राजकीय नेत्यांकडून निषेध केला. यावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी उडी घेतली आहे. अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ‘माफीवीर जवाहरलाल नेहरु’ असे लिहिण्यात आले आहे. त्याबरोबर ‘नेहरुंचे आत्मचरित्र’ असेही यात म्हटले आहे. याबरोबर त्यांनी काही संदर्भही दिले आहे.ते खालील प्रमाणे आहेत.
- १४ दिवसांचा तुरुंगवास सहन न झाल्याने त्यांचे वडील मोतीलाल नेहरुंच्या मध्यस्थीने ब्रिटीश सरकारची माफी मागून नाभा तुरुंगातून बाहेर पडले. एवढंच नाही एकूण ४ जणांना अटक केले असता, नेहरुंनी त्यांच्या जवळ मित्रांची सुटका करुन घेतली व चौघांचे आळ एकावर टाकून तुरुंगात तिघांनी सुटका करुन घेतली.
- जवाहरलाल नेहरुंना स्वातंत्र्या लढ्यात अनेकदा शिक्षा झालाी पण प्रत्येक वेळी त्यांना कारागृहात न ठेवता नजरकैद किंवा खास व्यवस्थेत ठेवले गेले. नेहरु केवळ एकदाच कारागृहात गेले ते ही केवळ १४ दिवस तेथून आपल्या वडिलांच्या मदतीने ब्रिटिशांची माफी मागून ते बाहेर पडले. त्याच नाभा जेलची ही कथा.
- जेलमधील घाण आणि रोगराई पाहून नेहरुंना आपल्या जीवाची भीती वाटत होती. एका मोठ्या राजकीय घराण्याची संबंधित असल्याने खुद्द व्हाइसरॉय ने त्यांची चौकशी केली. त्यावेळी जवाहरलाल नेहरुंनी आपल्या वडिलांना पत्र लिहून इथली अवस्था सांगितली. मोतीलाल नेहरुनी तडक व्हाईसरॉय भेट घेत सुटकेची मागणी केली. याला कॅप्शन देताना ते म्हणाले, “जे सतत सावरकरांचं पत्र दाखवतायत त्यांच्यासाठी ही पत्रेही पहा. जितक्या गलिच्छ शब्दात ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी तीच भाषा आताही वापरा.” दरम्यान शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.
must read