Sharad Pawar । शरद पवारांचा अजित पवार यांना मोठा धक्का! बडा नेता सोडणार पक्षाची साथ

Sharad Pawar । विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक भूकंप येत आहेत. अनेक राजकीय नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. याचा फटका संबंधित पक्षांना आगामी काळात बसू शकतो. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांची साथ देणार आहेत. प्रवीण माने हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे इंदापूर मधील राजकीय गणिते बदलली जाऊ शकतात.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरवात केली होती. पण त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. याच काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

लोकसभेत इंदापूर तालुक्यातील दिग्गज नेते असतानाही सुप्रिया सुळे आघाडीवर राहिल्या. त्या नंतरच्या काळात प्रवीण माने यांचे नाव इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून अंतिम करण्यात आल्याची चर्चा असल्याने आता प्रवीण माने याचा प्रवेश केव्हा होणार याकडे नजरा खिळल्या होत्या. त्यानुसार आता उद्या म्हणजे शनिवार (ता. 03) रोजी पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे प्रवीण माने अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची साथ देणार आहेत.

Leave a Comment